राजुरा : तालुक्यातील विरुर स्टेशन येथे धोबी, वरटी, परिठ समाजाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समाजाची कार्यकारिणी गठित करण्यात आली. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष विश्र्वनाथ मुक्के, ज्येष्ठ समाजसेवक देवाजी बारसागडे, उद्धवराव नांदेळकर, बंडूजी टेंभेकर, जिल्हा युवा उपाध्यक्ष अनिल रोहणकर आदी उपस्थित होते. यामध्ये अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर तुराणकर, सचिव सत्यपाल मेडपल्लीवार, उपाध्यक्ष गणेश तुराणकर, कार्याध्यक्ष बापुजी चिंचोळकर, कोषाध्यक्ष मारोती निलमवार, सदस्य संदीप तुराणकर, रमेश भोस्कर, नारायण श्रीकोंडावार, विजय निलमवार, स्वप्नील निलमवार, रमेश तुराणकर, महिला अध्यक्ष संगिता भोस्कर, संचिव शोभा निलमवार, उपाध्यक्ष अनिता निलमवार, कार्याध्यक्ष अनिता चिंचोलकर, कोषाध्यक्ष वैशाली तुराणकर, सदस्य प्रतिभा तुराणकर, रेखा तुराणकर, मनिषा मेडपल्लीवार, कमला श्रीकोंडावार, नंदिनी तुराणकर, वेणू तुराणकर, मीना शक्षीरसागर, मंगला मेडपल्लीवार, पुष्पा क्षिरसागर, युवा अध्यक्ष म्हणून सुरज भोस्कर, सचिव क्रिष्णा क्षीरसागर, उपाध्यक्ष स्वप्नील निलमवार, कार्याध्यक्ष शुभम भोस्कर, कोषाध्यक्ष तेजस चिंचोलकर, सदस्य सुरज भोस्कर, संस्कार निलमवार, प्रेम श्रीकोंडावार, क्षितीज तुराणकर, मंगेश तुराणकर यांची कार्यकारिणी गठित करण्यात आली.
धोबी समाजाची कार्यकारिणी गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:30 AM