चंद्रपूर : युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्य करणाऱ्या ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्षपदी हितेश नभवानी तर सचिवपदी विक्रम अरोरा यांची निवड करण्यात आली आहे. तर मुलांसाठी कार्य कार्यरत असणाऱ्या ज्युनिअर जेसी विंगच्या अध्यक्षपदी गौरी अजय मार्कंडेवार, सचिवपदी यश हरीश मुथा यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन स्थानिक आयएमए सभागृह येथे १४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केरळचे अनिश मॅथ्यू, नाशिक संजय काथे, प्रमोद वाघ तर मार्गदर्शक म्हणून मनीष तिवारी व अक्षय तुंगयात उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्युनिअर जेसी विंगतर्फे बुक्स शेअर या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर पुस्तके रद्दीत टाकून देतात. अशा विद्यार्थ्यांकडून पुस्तके गोळा करून गरजू व हुशार विद्यार्थ्यांना ते देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून शीफा नाहीद हुसैनची नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनलची कार्यकारिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:26 AM