जैन मंदिर परिसरात चालवली जाते गोशाळालोकमत न्यूज नेटवर्कआयुधनिर्मानी (भद्रावती): आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या आणि कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची मागणी लक्षात घेऊन शासनाने नुकताच कर्जमुक्तीचा निर्णय घेतला आहे. असाच आर्थिकदृष्ट्या कमजोर शेतकऱ्यांना स्थानिक जैन मंदिर विश्वस्त मंडळाने गोशाळेतील निरूपयोगी बैलजोडी देवून शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.भद्रावती येथील श्रीक्षेत्र प्रभू पार्श्वनाथ मंदिर परिसरात या देवस्थानाच्या विश्वस्त मंडळद्वारे एक गोशाळा चालविली जाते. मानवतावादी व दयाबुध्दीने चालवल्या जाणाऱ्या या गोशाळेत ५००-६०० गाई व म्हशी आहेत. तसेच जवळपास शंभरच्या आसपास बैल व गोऱ्हे असल्याचे आहेत. परिसरातील शेतकरी, नागरिक व पोलस प्रशासनाला प्रापत जनावरे येथील गोशाळेला दिली जातात. दयाभावी वृत्तीने जैन मंदिर विश्वस्त मंडळ अशा जनावरांना आश्रयास ठेवून घेतात. दुधाळ गाई-म्हशीपासून दूध मिळते. परंतु गोऱ्हे व बैल हे गोशाळेकरिता निरोपयोगी ठरतात. त्यांच्या चाऱ्याचा व उदरनिर्वाहाचा भुर्दंड जैन मंदिर विश्वस्त मंडळाला विनाकारण पडत असतो. मानवतावादी दृष्टिकोन व अहिंसावादी तत्व जोपासणाऱ्या या गोशाळेच्या दृष्टीने येथील बैल वा गोरे म्हणजे निरोपयोगीच असतात. त्यांना ना सोडून देता येत, ना सांभाळता येत, अशी अवस्था गोशाळेची होते. त्यावर उपाय म्हणजे शेतकऱ्यांना बैलांचे व गोऱ्ह्यांचे काम पडत असते. परिसररात अनेक शेतकऱ्यांकडे शेतात कसायला बैलजोडी नाही. त्यामुळे बैलजोडीच्या विवंचनेत कास्तकार असतात. दुसरीकडे या गोशाळेतील बैल गोशाळेच्या दृष्टीने निरूपयोगी असतात. अशावेळी जैन मंदिर प्रशासनाने गरजू शेतकऱ्यांना त्यांच्याकडील बैलजोडी उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांची निकड भागू शकते. सदैव मानवतावादी व समाजोपयोगी कार्यरत सक्रीय असणाऱ्या मंदिर प्रशासनाने गरजू कास्तकारांना त्यांच्याकडील निरूपयोगी बैल शेतात काम करण्यासाठी उपलब्ध करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा बैलजोडीसाठी प्रतीक्षेत असलेले शेतकरी करीत आहे.
‘त्या’ बैलजोडीची शेतकऱ्यांना अपेक्षा
By admin | Published: June 28, 2017 12:56 AM