शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांच्या श्रमदानाने विसलोन गावात शोषखड्डे

By admin | Published: June 08, 2017 12:39 AM

तालुक्यातील विसलोन गावात मागील कित्येक वर्षांपासून पाणी टंचाई आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्याकरिता नेहमी पायपीट करावी लागत आहे.

भद्रावती तालुका : गावकऱ्यांचा सहभागलोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : तालुक्यातील विसलोन गावात मागील कित्येक वर्षांपासून पाणी टंचाई आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्याकरिता नेहमी पायपीट करावी लागत आहे. रब्बी हंगामात पाण्याअभावी पीक घेता येत नसल्याने विसलोन येथील शेतकऱ्यांची नेहमीच आर्थिक कोंडी होत होती. यावर उपाय म्हणून गावातील पाणी गावातच मुरले तर जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होईल, याकरिता जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विसलोन गावात अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांची प्रत्येक घरात श्रमदानातून शोषखड्डे तयार करून दिले आहे.विसलोन गावाची लोकसंख्या ६९४ असून १७१ कुटुंबे आहेत. येथील सर्वच कुटुंब शेती व्यवसाय करतात. मागील कित्येक वर्षांपासून विसलोन गावात भीषण पाणी टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याकरिता नागरिकांची चांगलीच दमछाक होत असते. जमिनीमध्येही पाणी नसल्यामुळे विसलोन येथील शेतकरी रब्बी पीक घेत नाही. गावात पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली निघावी याकरिता आ. बाळू धानोरकर यांनी गावातील पावसाचे पाणी तसेच वापर झाल्यानंतर असलेले पाणी जमिनीत झिरपले पाहिजे, अशी संकल्पना अधिकाऱ्यांसमोर मांडली. अधिकाऱ्यांनी ही संकल्पना उचलून धरीत प्रत्येक घरात शोषखड्डा श्रमदानातून तयार करण्याचे ठरविले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विसलोन गावात श्रमदानातून खड्डे तयार करण्याच्या कामाला आ. बाळू धानोरकर यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. यावेळी संवर्ग विकास अधिकारी सुदर्शन तुपे, संवर्ग विकास अधिकारी ओमप्रकाश यादव, उपविभागीय कृषी अधिकारी एस. बी. राजवाडे, वेकोलिचे व्यवस्थापक त्रिपाठी, तालुका कृषी अधिकारी राजेश पेचे, नायब तहसीलदार काळे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेडाळू राजेश नायडू, सरपंच करुणा आगलावे, भोजराज झाडे, ग्रामपंचायत सदस्य अनिता रोडे, मनिषा निब्रड, मनोरमा बंड, ममता सूर्यवंशी, तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय राजूरकर, योगेश उमरे, बंडू खापने, निळकंठ कुत्तरमारे, मनोज दानव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.