पिंपळगाव : स्थानिक पिंपळगाव (भो.) जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्य नागरीकासह या परिसरातील प्रलंबित असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्र विस्ताराने खूप मोठा असल्यामुळे प्रत्येक गावापर्यंत पोहचण्यास अडचणी येत आहेत. मात्र आपण प्रत्येक गावातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न कार्यकर्त्याचा माध्यमातून सुरू असून प्रत्येकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.भारतीय जनता पार्टी चिमूरच्या वतीने नांदगाव (जाणी) येथे सोमवारी आयोजित स्नेहमिलन सोहळा व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार कीर्तीकुमार भांगडिया तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष अतुल देशकर, जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, गडचिरोली जिल्हा सचिव डॉ. भारत खट्टी, तालुका अध्यक्ष दीपक उराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य उमाजी कुथे, सभापती रवी मेश्राम, पंचायत समिती सदस्या अर्चना शेबे, हरिभाऊ शेबे, भास्कर लांजेवार, टिकाराम ढोरे, नागोराव पिलारे, नरेंद्र दुपारे, सरपंच भारती लांजेवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक उराडे यांनी केले. संचालन प्रा. प्रकाश बगमारे यांनी तर आभार क्रिष्णा सहारे यांनी मानले. कार्यक्रमाला पिंपळगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष उपस्थित होते. (वार्ताहर)
योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवा : अशोक नेते
By admin | Published: January 07, 2016 1:29 AM