लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण शेतकरी व गरीब वर्गाच्या तसेच शहरी भागातील नागरिकांसाठी अनेक जनकल्याणकारी योजना केंद्र शासनाने सुरू केला आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची व त्यांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी म्हणून भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.जलाराम भवन येथे चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या (ग्रामीण) बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आ. नाना श्यामकुळे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहापौर अनिल फुलझेले, विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, चंद्रकांत गुंडावार, वनिता कानडे, महामंत्री राहुल सराफ, संजय गजपुरे, जैनुद्दीन जव्हेरी, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, संध्या गुरनुले, बबन निकोडे, रोहिनी देवतळे, डॉ. भगवान गायकवाड, केशव गिरमाजी, गजानन गोरंटीवार, नामदेव डाहुले, सुनील उरकुडे, नारायण हिवरकर, रत्नमाला भोयर, गोदावरी केंद्रे, शिवाजी सेलोकर, किशोर बावणे, हिरामन खोब्रागडे, कृष्णा सहारे, डॉ. हटवादे, वाघू गेडाम, मनोहर कुळसंगे आदी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांचा सत्कार करण्यात आला.
जनकल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवा : अहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:15 PM