लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी निर्माण केलेल्या विशेष व्याघ्र संरक्षण दलातील २३४ अस्थायी पदांना २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयाने संरक्षण दलातील सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक व वन निरीक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी २७ मार्च २०१८ रोजी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची (एसटीपीएफ) स्थापना करण्यात आली होती. यामध्ये २२४ अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. प्रशासकीय विभागाच्या आकृतिबंधात ही अस्थायी पदे समाविष्ट नाहीत. त्यामुळे या पदांना मुदतवाढ मिळणार की नाही, या प्रश्नाने कर्मचारी अस्वस्थ होते. मात्र, आकृतिबंधात अस्तित्वात नसलेल्या या पदांना मुदतवाढ देण्याचे अधिकार वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आला आहे.या विशेष दलात सहाय्यक वनसंरक्षक वनक्षेत्रपाल, वननिरीक्षक व वनरक्षक असे एकूण २३४ अस्थायी पदांवर कर्तव्य बजावतात. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे देशपातळीवर महत्त्व लक्षात घेता विशेष व्याघ्र संरक्षण दलातील अस्थायी पदांना मुदतवाढ देणे गरजेचे होते. महसूल व वनविभागाचे विशेष कार्याधिकारी स्वप्निल देशभ्रतार यांनी मंगळवारी शासन निर्णय जारी करून या पदांना मुदतवाढ दिली आहे.विकास कामांतील अडथडे दूर१ मार्च २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीकरिता मुदतवाढ मिळालेल्या विशेष व्याघ्र संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक वनसंरक्षक २, वनक्षेत्रपाल ६, वनरक्षक १६२, वननिरीक्षक ५४ असे एकूण २२४ जणांचा समावेश आहे. या निर्णयामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र संवर्धन व विकास कामांंतील अळथडे दूर होणार आहे.
विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या २२४ अस्थायी पदांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:22 PM
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी निर्माण केलेल्या विशेष व्याघ्र संरक्षण दलातील २३४ अस्थायी पदांना २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयाने संरक्षण दलातील सहाय्यक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक व वन निरीक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना दिलासा : आकृतिबंधाबाहेर असूनही मिळाला न्याय