लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : दिवाळी सणासाठी सर्वजण आपल्या स्वगृही येतात. त्यामुळे रेल्वे, बस, ट्रॅव्हल्समध्ये मोठी गर्दी दिसून येते. याचाच फायदा घेत ट्रॅव्हल्सचालक तिकिटाचे दर मनमानी आकारले जातात. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत असतो.नियमानुसार प्रत्येक टप्प्यावर तिकिटाचे दर निश्चित आहे. मात्र, तरीही सण-उत्सवाच्या काळात प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. प्रवाशांना दुपटीपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागते.
...तर आरटीओत करा तक्रार- ट्रॅव्हल्सचालकांना प्रत्येक टप्प्यानुसार दर ठरवून देण्यात आले आहे. तरीही सिजनमध्ये ट्रॅव्हल्सचालक अतिरिक्त दर आकारत असतात.- अतिरिक्त दर आकारत असल्यास ट्रॅव्हल्सचालकांची तक्रार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करावी. त्यांच्यावर दंड करता येते.
ट्रॅव्हल्सचालक काय म्हणतात?
मागील काही महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दर वाढवले होते. परंतु, आता तिकीट दर स्थिर आहेत. कोणतीही वाढ करण्यात आली नाही. - ट्रॅव्हल्सचालक.
मागील दोन वर्ष वाहतूक व्यवसायाला मोठा फटका बसला होता. आता थोडीशी स्थिती पूर्वपदावर येत आहे. प्रवासी पूर्वीच्या तुलनेत वाढले असले तरी सतत पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे व्यवसाय परवडेनासा झाला आहे. -ट्रॅव्हल्सचालक
एसटीच्या दीडपट भाड्यापेक्षा अधिक दर आकारू नये, असे शासन निर्देश आहेत. याचे उल्लघंन करून दर आकारत असतील तर कारवाई करण्यात येईल. - किरण मोरे, आरटीओ, चंद्रपूर