शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

अल्पसंख्यकांसाठी जादा निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 11:01 PM

राष्ट्रीय अल्पसंख्याक समुदायाला विकासाच्या प्रवाहात अणण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी जादा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. स्थानिक स्थानिक जैन भवनात पार पडलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जैन भवनात संवाद यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय अल्पसंख्याक समुदायाला विकासाच्या प्रवाहात अणण्यासाठी केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा, यासाठी जादा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. स्थानिक स्थानिक जैन भवनात पार पडलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार नाना शामकुळे, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष जमाल सिध्दीकी, प्रदेश सचिव ऐजाज देशमुख, विजय राऊत, महापौर अंजली घोटेकर, खुशाल बोंडे, राहुल सराफ, वरोराचे नगराध्यक्ष अहतेशाम अली, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा स्थायी समिती सभापती राहूल पावडे, भाजपा गटनेते वसंत देशमुख, बल्लारपूर येथील जामा मस्जिदचे अध्यक्ष अलहाज शेख उस्मान, मौलाना हाफीज मुख्तार खान, शेख इनायत, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेख जुम्मन रिझवी, अल्पसंख्यांक मोचार्चे महानगर अध्यक्ष आमीन शेख,सैय्यद सज्जाद अली, सोएब अली, जैन समाज प्रमुख महेंद्र मंडलेचा, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, भाजपा अनुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे, अफजल, सोहेल अन्सारी आदी उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, केंद्र शासनाने अनेक योजना सुरू केल्या. या योजनांमुळे अल्पसंख्याक समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. त्यामुळे संघटनानी समुदायात जागृती केली पाहिजे. शेख जुम्मन रिझवी यांनी अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. संचालन नासिर खान, जहिर खान कादरी यांनी केले. आमीन शेख यांनी आभार मानले. यावेळी जहिर खान कादरी, गौस खान पठाण, शब्बीर अलीयार अहमद, शेख हुसैन, हाजी शेख फरीद, डॉ. शेख मुबारक, फिरोज खान, शायरा शेख, रूखसाना शेख, सुरेश गोलेवार आदी उपस्थित होते.अल्पसंख्यक समुदायासाठी चार हजार कोटींची तरतूदकेंद्र सरकारच्या वतीने देशातील अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी चार हजार कोटी रूपयांची तरतूद करण्याचे आश्वासन देण्यात आले. अल्पसंख्याक महिलांच्या शैक्षणिक सुविधांसाठी देशात पहिल्यांदाच दोन हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्री-मॅट्रीक, पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती, व्यावसायिक व तंत्र शिक्षणाकरिता ५२२ कोटी रुपयांच्या तरतुदीसोबतच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद नॅशनल फेलोशीप देण्यात येणार आहे. मोफत व्यावसायिक प्रशिक्षण आणि शैक्षणिक कर्जाकरिता १५३ कोटींची तरतूद केली असून या समुदायाने मुख्य प्रवाहात येऊन विकास साध्य करण्याची गरज आहे, असेही केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी यावेळी सांगितले.