लोकमत न्यूज नेटवर्कमूल : विकासाच्या बाता करणारे हे सरकार केवळ सिमेंटचे जंगल निर्माण करीत आहे. आरोग्य, वीज, सिंचनाची समस्या अजुनही कायम आहे. रोजगार नसल्याने बेरोजगाराची फौज दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले. मूल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतीबा फुले मार्केट यार्डचे लोकार्पण तथा शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष रावत होते. याप्रसंगी सत्कारमूर्ती नवनिर्वाचित खासदार बाळु धानोरकर उपस्थित होते. मेळाव्याला चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदु नागरकर, महेश मेंढे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, समता परिषदेचे सरचिटणीस दीपक वाढई, शेतकरी खरेदी- विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुरसे, पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कवडू कुंदावार, बल्लारपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष करीमभाई, किसान सेलचे अध्यक्ष रूमदेव गोहणे, जि.प.माजी सदस्या मंगला आत्राम, नगरसेवक विनोद कामडे, ललीता फुलझेले आदींची उपस्थिती होती.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते नामदार विजय वडेट्टीवार, नवनियुक्त खासदार बाळु धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी खासदार धानोरकर म्हणाले, या विधानसभा क्षेत्रातील नागिरकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. यामुळेच मला ३२ हजार मतांची लिड मिळाली. माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तळा जाऊ देणार नाही. प्रत्येक गावांत जाऊन गावातील समस्या सोडवून विकासाची गंगा पोहचविण्याचे काम आपण करणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी तालुक्यातील प्रगतशीर शेतकरी घनश्याम लाडे राजगड, महेश कटकमवार बोरचांदली, ज्ञानेश्वर बोरकर उश्राळा, शामराव वाढई येजगांव, भास्कर आंबटकर नांदगांव, प्रभाकर लेनगुरे चिमढा, शालिक मुनघाटे चिखली, गणेश वाढई बेंबाळ यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संचालन संजय पडोळे यांनी तर आभार संजय पाटील मारकवार यांनी मानले. मेळाव्याला तालुक्यातील शेतकरी, नागरिक उपस्थित होते.
राज्यात सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:34 AM
विकासाच्या बाता करणारे हे सरकार केवळ सिमेंटचे जंगल निर्माण करीत आहे. आरोग्य, वीज, सिंचनाची समस्या अजुनही कायम आहे. रोजगार नसल्याने बेरोजगाराची फौज दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ,.....
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : मूलमध्ये पार पडला शेतकरी मेळावा