बाईकस्वार गंभीर : मूल मार्गावरील घटनाचंद्रपूर : नेहरू नगरकडून बंगाली कँपकडे डबलशिट येत असलेल्या बाईकस्वारांना मूल मार्गाने येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक बसली. यात दुचाकीवरील महिला चिरडून जागीच ठार झाली तर, युवक गंभीर जखगी झाला. अपघात एवढा भीषण होता की महिलेचे प्रेत खरडून काढावे लागले, तर बाईकसह दुचाकीस्वार ट्रकच्या पुढील चाकात फसून सुमारे २० मीटर फरफटत गेला.जखमी युवकाचे नाव नदीम खाँ रसिद खाँ पठाण (२४) असून तो तुकूम परिसरात राहणारा आहे. मृत महिलेची ओळख सायंकाळी उशिरा पटली असून तिचे नाव उन्नती शैलेश गावंडे (३५, रा.दुर्गापूर) असे आहे.नदिमला पुढील उपचारासाठी नागपूरला दाखल करण्यात आले आहे. वनराजिक महाविद्यालयाजवळ शनिवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. संबंधित युवक आणि महिला एमएच २९/एच २६६४ या स्प्लेंडर प्लस या दुचाकीने नेहरूगनरकडून बंगाली कँपकडे वळले होते. याच वेळी मूलकडून येणाऱ्या एमपी ०९/एचजी ८९१९ या कंटेनरची चालकाच्या बाजूने दुचाकीला धडक बसली. यात उन्नती पुढच्या चाकात येऊन चिरडली गेली. तर नदिम दुचाकीसह फरफटत गेला. अपघातानंतर फरार झालेला ट्रकचालक खालीद शाबुद्दीन हुसेन याला अटक करण्यात आली. असे त्याचे नाव आहे. (जिल्हा प्रतिनिधी)वाहतूक पोलिसांची कर्तव्यतत्परताया अपघातानंतर मोठ्या संख्येने जमाव गोळा झाला होता. प्रेताची अवस्था पाहून अनेकांच्या मनात रोष व्यक्त होत होता. परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता होती. अशा परिथितीत रामनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करताच वाहतूक पोलिसांनी पे्रताचे रस्त्यावर विखुरलेले अवयव गोळा करून पिशवीत जमा केले. पोलिसांना शव अक्षरश: खरडून काढावे लागले. भोवळ यावी असा हा प्रकार होता. मात्र वाहतूक शाखेच्या शिपायांनी प्रसंगवधान राखून मार्ग मोकळा केला. हे कार्य बघून उपस्थितांनी पोलिसांच्या सेवेचे कौतुक केले.
भरधाव कंटेनरने महिलेला चिरडले
By admin | Published: December 06, 2015 12:45 AM