अनेकश्वर मेश्राम।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : महावितरणने जानेवारीपासून वीज बिलाचा भरणा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सक्ती केली. यासाठी वीज बील भरणा केंद्रातील कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यात प्रशिक्षणही दिले. मात्र काही वीज भरणा केंद्राने आता सुविधा उपलब्ध नाही, असे म्हणत वीज देयक स्वीकारणे बंद केले. परिणामी ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. आॅनलाईन पद्धतीने वीज बील भरणे डोकेदुखी ठरले आहे. यामुळे महावितरणचा महसूल थकित राहण्याची शक्यता बळावली आहे.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत विसापूर, नांदगाव (पोडे), चारवट, हडस्ती येथील वीज ग्राहक देयकाचा भरणा नियमित करीत होते. मात्र सदर बँकेच्या शाखेने आॅनलाईन वीज बिलाचा भरणा सुविधेअभावी बंद केला. परिणामी वीज ग्राहकात संताप व्यक्त केला जात आहे. केंद्र व राज्य सरकार डिजीटल भारताचे स्वप्न रंगवित आहे. मात्र तशा सुविधा ग्रामीण भागात पोहचल्या नाहीत. महावितरण कंपनीचा संगणीकृत पद्धतीने वीज बिल भरण्याचा प्रकार वीज ग्राहकांसाठी मोठा अडचणीचा ठरला आहे. अनेकजण वीज बिल थकित ठेवत आहेत.बँक अयशस्वी तर ग्राहकांचे काय?विसापूर येथील मध्यवर्ती सहकारी बँक ग्राहकांचे वीज देयक स्वीकारण्यास स्पष्ट नकार देत आहे. यामुळे वीज ग्राहक अडचणीत आले. महावितरण कंपनीने या बँकेला वीज बिल भरणा केंद्र म्हणून नेमले. वीज ग्राहकांना ही सुविधा फायदेशीरही होती.महावितरण कंपनीच्या आदेशान्वये जानेवारी महिन्यापासून वीज देयक संगणकीकृत पद्धतीने भरण्याचे सांगितले आहे. यासाठी विसापूर येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व इतर वीज भरणा केंद्राच्या कर्मचाºयांना यासाठी डिसेंबर महिन्यात प्रशिक्षण दिले. वीज ग्राहकांनी सेतू केंद्र अथवा महावितरणच्या कार्यालयात वीज बिलाचा भरणा करावा. विसापूर बँकेने वीज बील स्वीकारण्यास नकार दिला असेल तर त्याची वरिष्ठांना माहिती दिली जाईल.- एस. एच. यादव, कनिष्ठ अभियंता, महावितरण, बल्लारपूर.
आॅनलाईन वीज बिल भरताना डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 11:08 PM
महावितरणने जानेवारीपासून वीज बिलाचा भरणा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सक्ती केली. यासाठी वीज बील भरणा केंद्रातील कर्मचाºयांना डिसेंबर महिन्यात प्रशिक्षणही दिले.
ठळक मुद्देमहावितरणच्या फतव्याने ग्राहकात संताप : ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना अडचण