लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील नागाळा येथील पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूर व तालुका मूलच्या वतीने तहसील कार्यालयासमोर माजी आमदार देवराव भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.मूल तालुक्यातील नागाळा येथील पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अत्याचारग्रस्त बालिकेला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. बालिकेचे पुनर्वसन करण्यात यावे, तिच्या शिक्षणाची सोय करण्यात यावी, पीडित कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींवर कठोर कारवाई करावी, यासाठी जेष्ठ विधीतज्ज्ञ नेमावा, यांच्यासह अनेक मागण्याचे निवेदन शिष्टमंडळातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत खनके, गंगाधर कुनघाडकर, जिल्हाध्यक्ष मिनाक्षी गुजरकर, कल्पना गिरडकर, न. प. बांधकाम सभापती महेंद्र करकाडे, नगरसेवक विनोद कामडी, चंद्रकांत आष्टनकर, प्रशांत समर्थ, रेखा येरणे, ललीता फुलझेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश पोटवार, सामाजिक कार्यकर्ते केमदेव मोहुर्ले, नामदेव लोणबले, डॉ. पद्माकर लेणगुरे, गुरुदास चौधरी, संजय पडोळे, दीपक देशपांडे, अमित राऊत, राजेश सावरकर यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
नागाळ्यातील घटनेच्या निषेधार्थ मूलमध्ये धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:46 AM
तालुक्यातील नागाळा येथील पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूर व तालुका मूलच्या वतीने तहसील कार्यालयासमोर माजी आमदार देवराव भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देविदर्भ तेली महासंघ : उपविभागीय अधिकाऱ्यांना देवराव भांडेकर यांचे निवेदन