शंकरपूर : पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या शंकरपूर येथील मकराच्या बैलाचा पोळा यावेळी कोरोनामुळे भरणार नाही. त्यामुळे उत्साहावर विरजण आले आहे.
शेतकऱ्याचा पारंपरिक सण म्हणून पोळा सणाकडे बघितले जाते. शंकरपूर येथे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. येथे मकराचा बैल निघत असल्याने पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. हा पोळा बघण्यासाठी दूरदूरहून लोक येत असून अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परंतु यावर्षी शासकीय आदेशानुसार पोळा भरणार नसल्यामुळे शंकरपूर येथील मकराचा बैल निघणार नाही. याबाबत असे सांगितले जाते की हा मकराचा बैल देशमुख वाड्यातून निघत होता. त्यानंतर देशमुख यांनी आपली सर्व जमीन डहाके परिवाराला विकल्यानंतर डहाके परिवारातर्फे हा मकराचा बैल काढण्यात येतो.
बॉक्स
अशी आहे परंपरा
पोळा या सणाच्या दिवशी मकराचा बैल काढण्यात येते. ही परंपरा आजही कायम आहे. हे मकर लाकडापासून बनविले असून षटकोनी आकाराचे आहे. या सर्व खांबावर दिवे लावले जाते. हा सजवलेला मकर बैल प्रथम हनुमान मंदिर, नंतर तेथून बाजार मैदानात आणले जातो. तिथे विधिवत पूजा केली जाते. गावाच्या मध्यभागी तोरण बांधल्या जाते. जेव्हा मकराचा बैल तोरणाखाली येतो, तेव्हाच तोरण तोडल्या जाते. तोरण तोडेपर्यंत मकराच्या बैलासमोर कोणतीही बैलाची जोडी निघत नाही. परंतु यावेळी हा मकराचा बैल निघणार नसल्याने शेतकऱ्यासोबतच जनताही हिरमुसलेली आहे.
कोट
शासकीय आदेशाचे पालन करायचे असल्यामुळे यावर्षी मकराचा बैल काढण्यात येणार नाही. त्याची घरीच विधिवत पूजा करण्यात येणार आहे.
-राजू डहाके, शंकरपूर.