शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

रात्री पिकाला पाणी देणे बेतले शेतकऱ्याच्या जीवावर; चंद्रपूर जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 12:38 PM

वरोरा तालुक्यातील महालगाव येथील शेतकरी वसंता नामदेव जांभुळे (३४) या शेतकऱ्याचा शुक्रवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास आपल्या शेतामध्ये पिकांना पाणी देताना विद्युत प्रवाहाचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा तालुक्यातील महालगाव येथील शेतकरी वसंता नामदेव जांभुळे (३४) या शेतकऱ्याचा शुक्रवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास आपल्या शेतामध्ये पिकांना पाणी देताना विद्युत प्रवाहाचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.सदर शेतकऱ्याचा मृतदेह विच्छेदन करण्याकरिता वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन महावीतरणचे मुख्यकार्यकारी अभियंता प्रशांत राठी व ऊर्जामंंत्री बावनकुळे यांचाविरुद्ध ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होऊ न देण्याची भूमिका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली आहे.दोन दिवसांपूर्वी वरोरा-भद्रावती मतदार संघाचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा द्यावा या मागणीसाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला होता. विविध पक्षांनी आंदोलन सुद्धा केले होते. त्यानंतर अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महावितरण यांनी परिपत्रक काढून दि.१ नोव्हेंबरपासून दिवसा ३ फेज वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र वरोरा महावितरणने या परिपत्रकाला केराची टोपली दाखवून दिवसा ३ फेज वीजपुरवठा बंद करून रात्रीला वीजपुरवठा चालू ठेवला होता. त्यामुळे संबंधित शेतकरी आपल्या शेतातील पिकाला ओलित करण्याकरिता रात्री गेला असता त्याला नाहक आपला जीव गमवावा लागला आहे.मृत्यू शेतकऱ्याचे वडिल ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरण वरोराचे मुख्यकार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांच्या विरोधात वरोरा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेले होते.

टॅग्स :AccidentअपघातFarmerशेतकरी