शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी संघटनेचा झेंडा

By admin | Published: February 16, 2016 1:13 AM

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जांगापैकी १४ जागा जिंकून शेतकरी संघटनेने बाजार

राजुरा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या १८ जांगापैकी १४ जागा जिंकून शेतकरी संघटनेने बाजार समितीवर आपला झेंडा फडकावला आहे.सोमवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. सहकारी संस्था मतदार संघामध्ये एकूण १४ उमेदवार उभे होते. त्यामधुन ७ उमेदवार निवडावयाचे होते. सातही उमेदवार शेतकरी संघटनेचे निवडून आलेत. विजयी उमेदवारामध्ये बाळा इसनकर १०९, हरिश्चंद्र आवारी १०८, नारायण गड्डमवार १२०, नानाजी पोटे - ११०, रमेश बोबडे १२८, हरिदास बोकुटे ११४, दत्ता हिंगाणे याांना १११ मते मिळाली. या गटामधील काँग्रेस- भाजपा युतीचे पराभूत उमेदवार विजय उपरे ८४, श्यामराव कोटनाके ८७, शंकर गोनेलवार ८८, सुनील देशपांडे ९२, विनायक देशमुख ९५, दिलीप वांढरे ९७, प्रभाकर साळवे ९१ मते घेतली. सहकारी संस्था मतदार संघातून शेतकरी संघटनेचे विजयी उमेदवार मीरा काळे ११९, शंकुतला देरकर ११३, पराभूत उमेदवार- नंदा गेडाम, माया भोयर, मतदार संघ गटामधून शेतकरी संघटनेचे कवडू पोटे यांनी काँग्रेस-भाजपा युतीच्या आबाजी ढुमने यांना ५ मतांनी पराभूत केले. कवडू पोटे यांना ११८ मते तर आबाजी ढुमणे यांना १०३ मते मिळाली.शेतकरी संघटनेचे पुंजाराम बरडे यांनी काँग्रेसचे साईनाथ बतकमवार यांना ७ मतांनी पराभूत केले. साईनाथ बतकमवार यांना १०७ तर पुंजाराम बरडे यांना ११३ मते मिळाली.ग्रामपंचायत मतदार संघातून काँग्रेस-भाजपा - शिवसेना युतीचे उमेदवार अविनाश जेनेकर २७३, संतोष झाडे २६७, किसन टेकाम २५९, मारोती सिडाम २८२, चार उमेदवार विजयी झाले. शेतकरी संघटनेचे पराभूत उमेदवार संतोष डोंगे १७०, दादा वडस्कर १७०, आनंद चहारे १९७, प्रकाश वेडमे १७२ हे आहेत.व्यापारी अडते मतदार संघातून शेतकरी संघटनेचे मनमोहन सारडा ७७, विठ्ठल पाल ५९ विजयी झाले. पराभूत उमेदवार सतीश कोमरवेलीवार १७, विष्णुप्रसाद नावंधर २१, महेश रेगुंडवार ११, रामअवतार सोनी ४, हमाल मापारी मतदार संघातून शेतकरी संघटनेचे राजू पहानपटे यांनी काँग्रेसच्या सय्यद सखावत अली यांना १ मतानी पराभूत केले. राजू पहानपटे यांना १३ मते तर सय्यद सखावत अली यांना १२ मते प्राप्त झाली. विजयानंतर शेतकरी संघटनेचे माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली. याप्रसंगी प्रभाकर दिवे, नगरसेवक प्रा. अनिल ठाकुरवार, सुभाष रामगिरवार, मधुकर चिंचोलकर, घनशाम हिंगाणे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीत कॉंग्रेस- भाजपा युतीला मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. या निकालावर भविष्यातील राजकीय आराखडे बांधले जात आहे. (शहर प्रतिनिधी)