पळसगाव : शेतकऱ्यांना विविध सोसायट्या, सहकारी संस्था याकडून पीक कर्ज घेऊन शेतीसाठी पैसा उभा केला आहे. त्यातूनच शेतकऱ्यांनी शेतात कापूस, सोयाबीन, तूर, यासारख्या खरीप पिकाची लागवड केली आहे; परंतु सध्या पाऊस बऱ्यापैकी पडल्यामुळे कापूस, सोयाबीन हे पीक चांगले बहरले. परंतु त्याचबरोबर शेतात पिकाबरोबर गवतदेखील वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ते गवत काढण्यासाठी मजुराची गरज आहे. परंतु मजुरांच्या टंचाईबरोबर मजुरी दरवाढीच्या समस्याला शेतकऱ्यांना समोर जावे लागते आहे.
काही गावांत तर मजूर न मिळत असल्यामुळे इतर गावांतून मजूर बोलावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील मजुराला १५० ते २०० रुपये मजुरी व त्याचबरोबर त्यांना या-जायचे भाडेसुद्धा द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. तणनाशक बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे; परंतु त्यांच्या किमती खूप महागड्या असल्यामुळे तसेच तणनाशक फवारणीमुळे पिकाच्या उत्पादनावरदेखील त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे कितीही खर्च झाला तरी निंदण्याशिवाय पर्याय नाही.
130821\img-20210810-wa0005.jpg~130821\img-20210810-wa0007.jpg~130821\img-20210810-wa0006.jpg
caption~caption~caption