लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मागील २६ डिसेंबरपासून तुरीला हमीभाव, नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले शेतकऱ्याची प्रकृती खालावल्याच्या कारणावरून भिसीचे ठाणेदार मंगेश काळे यांनी बळीजबरी करून उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपोषणकर्त्याला उपचारार्थ दाखल केले होते. उपचाराअंती बुधवारी उपोषणकर्ता निलेश राठोड कन्हाळगाव येथील उपोषण स्थळावर दाखल झाला आहे.तालुक्यातील तूर उत्पादक शेतकºयांच्या तुरीला हमीभाव व नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी निलेश राठोड यांनी आमरण उपोषण मागील १७ दिवसांपासून सुरू केले होते. या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली होती. त्यामुळे भिसी पोलिसांनी उपोषणकर्ता निलेश राठोड यांना बळजबरी करीत सोमवारी रात्री ९.३० वाजता दवाखान्यात उपचारासाठी भरती केले. यावेळी मारहाण केल्याचा आरोप उपोषणकर्ते राठोड यांनी केला. त्यामुळे दवाखाण्यात तनाव निर्माण झाला होता.मारहाण व बळजबरीच्या प्रकाराच्या विरोधात काँग्रेस, मनसे व राजकीय पुढारी, शेतकरी संघटना यांनी फलक लावत निषेध नोंदवून त्याच दिवशी रात्री उशिरा भिसीचे ठाणेदार मंगेश काळे व पोलीस शिपाई बाळासाहेब गडदे यांच्या विरोधात चिमूर पोलिसात तक्रार दाखल केली होती. सदर प्रकरण चौकशीत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. आता शेतकºयांचे हे आंदोलन कोणते, वळण घेते, याकडे समस्त शेतकºयांचे लक्ष लागले आहे.चिमुरात आज शेतकऱ्यांचा मोर्चा१५ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. उपोषणस्थळी कोणताही वरिष्ठ अधिकारी आला नाही. दरम्यान, सोमवारी भिसी पोलिसांनी उपोषणकर्त्याला मारहाण करून उपचारार्थ दवाखान्या बळजबरीने दाखल केले. भिसीचे ठाणेदार मंगेश काळे व शिपाई बाळासाहेब गडदे यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून तत्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी दुर्बल पीडित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हेमंत वसंत शेंद्रे व सचिव स्वप्नील मालके यांच्यासह शेकडो शेतकºयांचा मोर्चा गुरुवारी उपविभागीय कार्यालयावर धडकणार आहे.
उपोषणकर्ता शेतकरी पुन्हा उपोषणस्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 10:48 PM