शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 9:52 PM

चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातुन शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला पीएनबी फार्मर्स वेलफेअर ट्रस्टतर्फे २७ सप्टेंबर रोजी मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रस्तावाला मान्यता : सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातुन शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला पीएनबी फार्मर्स वेलफेअर ट्रस्टतर्फे २७ सप्टेंबर रोजी मान्यता देण्यात आली आहे. अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अजयपूर येथील ४.३४ हे.आर जमिनीवर सर्व आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या उच्चाधिकाऱ्यांशी चर्चा करून चंद्रपूर जिल्हयात अजयपूर येथे सदर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रासाठी अजयपूर येथील ८ ते १० एकर जागा उपलब्ध करून देण्याबाबत पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्टने केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने राज्य मंत्रीमंडळाने ६ एप्रिल २०१७ रोजी मान्यता दिली आहे. अजयपूर येथील सवर्हे नं.२६, २७ व ३१२ असे एकूण आराजी ५.५८ हे. आर पैकी ४.३४ हे. आर शासकीय जमीन या प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर करण्यात आली आहे. शासनाला प्राप्त अधिकारानुसार ३० वर्षांसाठी वार्र्षिक नाममात्र एक रुपया दराने भुईभाडे आकारारून नियमित अटी व शर्तीवर भाडे पट्टयाने जमीन देण्यात यावी व सदर भाडे पट्टयाचे त्याच तत्वावर नुतनीकरण करण्याची तरतूद भाडे पट्टयात अंतभुर्त करण्यात यावी, असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर पीएनबी फार्मर्स वेलफेअर ट्रस्टकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला ट्रस्टने मान्यता दिल्यामुळे सदर शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.शेतकरी, ग्रामीण युवक आणि महिला यांचा कौशल्य विकास घडवून आणि सामाजिक, आर्थिक क्रियाकल्पाच्या माध्यमातून त्यांचे अधिकाधिक कल्याण साधण्याच्या उद्देशाने पंजाब नॅशनल बँकेने पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्ट ही संस्था स्थापित केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशातील विविध ११ ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील अजयपूर येथे उभारण्यात येणाऱ्या या शेतकरी प्रशिक्षण केंद्रामुळे शेतकरी सक्षम व स्वयंपूर्ण होण्याच्या प्रक्रियेत मोठी मदत होणार आहे.केंद्रात अशी होणार कामेया शेतकरी प्रशिक्षण केंद्रामार्फत शेतकऱ्यांना गावामधून केंद्रामध्ये येण्यासाठी नि:शुल्क प्रवास, महिला व ग्रामीण युवक तसेच युवतींना शेती व शेतीसंबंधातील कामे, संगणक अभ्यासक्रम, ड्रेस डिझायनिंग व भरतकाम इ. चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शेतकरी प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी गावांना वारंवार भेटी देवून किसान क्लब निर्माण करतील आणि शेतकऱ्यांच्या घरात किसान गोष्ठींचे आयोजन करण्यात येणार आहे. दत्तक घेतलेल्या गावांमध्ये मॉडेल म्हणून गाव विकसित करण्यासाठी विकास कार्यक्रम हाती घेणे, सार्वजनिक सुविधा उपलब्ध करणे, वर्गखोल्यांची निर्मिती, वाचनालये, दवाखाने आदी सोयी उपलब्ध करणे, स्वयंसहाय्यता गटांना उत्तेजन देणे अशी सर्व कार्र्ये करण्यात येणार आहे. या शेतकरी प्रशिक्षण केंद्रात एक निवासी कक्ष, तीन वर्गखोल्या, दोन संगणक कक्ष, एक ट्रॅक्टर दुरूस्ती कार्यशाळा, एक कार्यालय, एक संचालन कक्ष, एक वाचनालय, एक मनोरंजन कक्ष, एक स्वयंपाकघर, एक भोजन कक्ष, एक माती परीक्षण प्रयोगशाळा, एक शेती उपकरणांसाठी साठवण कक्ष, मोबाईल व्हॅन, जीप यांच्या दोन गॅरेज, एक अतिथी कक्ष, असे शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे स्?वरूप राहणार आहे. या केंद्रात पॉलीहाऊस, फळबाग, पुष्प संवर्धन या कार्यक्रमांसह गांडूळ खत, मधमाशी संगोपन, अळंबी शेती, मत्स्यतळे, सुगंधी औषधी वनस्पती लागवड, भाज्या मशागत आदी प्रात्याक्षिके करण्यात येणार आहे.