हंसराज अहीर : टेमुर्डा व धानोरा येथे शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणांचे वितरणचंद्रपूर : राष्ट्रीय बागायती मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीबरोबरच भाजीपाला व अन्य पिकांचे उत्पादन घेऊन आर्थिक प्रगती साधावी, या उद्देशाने त्यांना भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. या बियाणांचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्कर्ष साधावा आणि आपल्या आर्थिक उत्पन्नात भर घालावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे केले.या भाजीपाला बियाणे वाटप कार्यक्रमास आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी मंत्री संजय देवतळे, भाजपा वरोरा विधानसभा प्रमुख विजय राऊत, ओम मांडवकर, शेखर चौधरी, वसंता बावणे, राजू गायकवाड, गजानन गुजरकर, तुळशीराम आगलावे, अरुण बरडे, विजय मोकाशी, राजेंद्र लडके, विलास जिले, सरपंच मारोती झाडे, सुरेश टेकाम, वाभीटकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाद्वारे सुमारे ३० शेतकऱ्यांना बियाणांचे वितरण करण्यात आले. त्यांकडून शपथपत्र भरून या बियाणांचा पूर्णपणे वापर करण्याची हमी घेण्यात आली.धानोरा येथेही बियाणे वितरणचंद्रपूर तालुक्यातील धानोरा येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांच्या हस्ते धानोरा व पिपरी येथील ३५० शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले. कृषी केंद्र संचालक असोसिएशनच्या सहयोगातून जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना बियाणांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.कार्यक्रमात आ. नाना शामकुळे, जि. प. सभापती देवराव भोंगळे, सदस्य ब्रीजभूषण पाझारे, नामदेव डाहुले, कोंडबाजी मासीरकर, पिपरीचे सरपंच पारस पिंपळकर, माजी पंचायत समिती उपसभापती श्रावण जुनघरे, धानोरा ग्रामपंचायत सदस्य विजय आगरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
भाजीपाला पिकाद्वारे शेतकऱ्यांनी उन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2016 12:41 AM