शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

शेतकरी आंदोलन पुन्हा तीव्र

By admin | Published: June 06, 2017 12:30 AM

शेतकरी संपाचे लोन आता चंद्रपूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पसरले आहे. या आंदोलनाला अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत ...

संपाचे पडसाद: चंद्रपुरात भाजीपाला रस्त्यावर टाकून शासनाचा निषेधलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकरी संपाचे लोन आता चंद्रपूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पसरले आहे. या आंदोलनाला अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याने आंदोलन तिव्र होत आहे. सोमवारी चंद्रपुरात रस्त्यावर भाजीपाला टाकून शासनाचा निषेध करण्यात आला. कोरपना आणि जिवती येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर वरोऱ्यात मोर्चा काढण्यात आला. चंद्रपुरात विदर्भ किसान मजदूर संघाचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली व राहुल पुगलिया यांच्या नेतृत्वात गांधी चौकात रस्त्यावर भाजीपाला टाकून शासनाचा निषेध करून निदर्शने देण्यात आली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी व सातबारा कोरा करण्यात यावा. शेतकऱ्यांचा शेतमालाला हमी भाव वाढवून मिळाला पाहिजे. राज्य शासनाच्या माध्यातून अनावश्यक बांधकामाचा (अनउत्पादिक) कार्यावर होणारा खर्च काही काळ थाबंवून तोच खर्च शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी करण्यात यावी. चंद्रपूर जिल्ह्यातील लहान मोठ्या नद्यांवर बंधारे बांधून शेतकऱ्यांची सिंचनाची सोय करण्यात यावी व इतरत्र शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता जोरदार नारेबाजी करण्यात आली.या निदर्शनात काँग्रेसचे मनपाचे गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक नंदू नागरकर, सुनिता लोढिया, अशोक नागापुरे, कुशल पुगलिया, जिल्हा मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र बेले, कामगार नेते वसंत मांढरे, रामदास वागदरकर, प्रवीण पडवेकर, निलेश खोब्रागडे, संजय महाडोळे, गजानन दिवसे, विरेंद्र आर्या, सुनिल बावणे आदी उपस्थित होते. बुधवारी जिल्हाबंदचे आवाहनही काही संघटनांनी केले आहे.बंदला उत्स्फूर्त प्रतिसादकोरपना : शेतकऱ्यांनी सोमवारी राज्यात बंदची हाक दिली. या पार्श्वभुमीवर पक्षभेद विसरून तालुक्याचे ठिकाण असलेल्या कोरपना येथे संपुर्ण बाजारातील दुकाने सकाळी बंद करून शासनाचा निषेध करण्यात आला. मुख्य बसस्थानक चौकापासून तहसील कार्यालय मार्गापर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली. या संपाला व्यापाऱ्यांनी समर्थन दिले. यामध्ये शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष अरुण नवले, बंडू राजुरकर, डॉ. निळकंठ मोहितकर, शांताराम देरकर, अविनाश मुसळे, डॉ. प्रकाश खनके, सुनिल खोब्रागडे, श्रीनू बलकी, मुरलीधर भोयर आदी सहभागी होते. यावेळी तहसीलदारांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.जिवतीत कडकडीत बंदपाटण : शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करण्यात यावा, या इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता जिल्ह्यातही चांगलेच जोर धरू लागले आहे. जिवती येथे सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्यातील मौजा पाटण येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनही केले. या आंदोलनाचे नेतृत्व शेख आरिफ यांनी केले. दोन तास वाहतूक ठप्प करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कलीम शेख, पाटणचे उपसरपंच भीमराव पवार, गंगाराम सोळंके, विठ्ठल चव्हाण व परिसरातील शेकडो शेतकरी आवर्जून उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन म्हणून परिसरातील मुस्लिम बांधवांनी रोजा ठेवला होता. उद्या जिल्हा बंदचंद्रपूर : किसान क्रांती समन्वय समितीतर्फे ७ जून बुधवारला चंद्रपूर जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. जिल्हा बंद आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन नगर विकास फ्रंट, संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती पक्ष इत्यादी पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. या बंदला नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी स्वयस्फुर्तीने सहकार्य करावे, असे आवाहन पप्पू देशमुख व शंकर बोढे यांनी केले. भरपावसात मोर्चावरोरा : वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील उपविभागीय कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. तालुक्यातील विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत या शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते . शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मोर्चा निघण्याच्या वेळेला पावसाने सुरुवात केली. तरीही मागे न हटता शेतकऱ्यांनी भरपावसातच मोर्चा काढला. स्थानिक गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विधानसभेचे माजी उपसभापती मोरेश्वर टेमुर्डे, अमोल डुकरे, नितीन मत्ते, समीर बारई, प्रदीप बुरान, जयंत टेमुर्डे, लक्ष्मन ठेंगणे, सुधाकर जीवतोडे व अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.