लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान, पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. यामुळे त्यांची आर्थिक नुकसान होवून अर्थकारण बिघडत चालले आहे. अशातच गावातील तीन शेतकºयांच्या गायी व बैलांच्या अचानक मृत्यू झाल्याने गावातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.सदर घटना गेवरा खुर्द येथील असून रविवारी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांनी आपाापली जनावरे चरायला सोडली. सायंकाळी घराकडे परततांना गावाशेजारीच दोन गायींचा मृत्यू झाला तर दोन बैलांपैकी घरी पोहताच एकाचा मृत्यू झाला. काही कळण्याचे आत एका पाठोपाठ तीन जनावरांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने शेतकºयांत भीती निर्माण झाली आहे. लागलीच विहीरगाव येथील पशुधन विकास अधिकाºयांना माहिती देण्यात आली. अत्यवस्थ असलेल्या बैलावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. मृत जनावरांच्या मालकांमध्ये सुमाजी आकू रामटेके व विलास लक्ष्मण भगत यांची प्रत्येकी एक गाय व जीवनदास सावजी वाढणकर यांच्या मालकीचा बैल होता तर चौथा बैल गजानन तुकाराम चौधरी यांच्या मालकीचा असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. मृत्यूचे कारण कळू शकले नसले तरी याबाबत सावलीचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. जुनेजा यांना माहिती कळविण्यात आली. वृत्त लिहिपर्यंत मृत जनावरांचा मृत्यूबाबत स्थानिक डॉक्टरांनी केवळ विषबाधेची प्राथमिक शक्यता वर्तविली आहे. एकाच वेळी एकाच गावात जनावरे मृत्यूमुखी पडल्याने या घटनेमागील खरे कारण आवश्यक झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी.मृत्यूचे कारण अस्पष्टचरायला गेलेल्या तीन जनावरांचा एकाच वेळी मृत्यू झाल्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांमध्यी भीती निर्माण झाली आहे. सदर जनावरांचा मृत्यू कशामुळे झाला, या जनावरांनी काय खाल्ले होते, सर्पदंशाचा तर प्रकार नाही ना, असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे.
जनावरांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शेतकरी भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 9:53 PM
आधीच संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येत आणखी भर पडत आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान, पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. यामुळे त्यांची आर्थिक नुकसान होवून अर्थकारण बिघडत चालले आहे. अशातच गावातील तीन शेतकºयांच्या गायी व बैलांच्या अचानक मृत्यू झाल्याने गावातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
ठळक मुद्देएकाच वेळी तीन जनावरे मृत