लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मान्सूनची चाहूल लागल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागती करुन खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे. खरीप पेरणी तोंडावर असताना शेतकरी वर्ग बि-बियाण्यांच्या खरेदीसाठी अािर्थक जुळवाजुळव करण्यात गुंतला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाणांच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे.गतवर्षी खरीप पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, ओला दुष्काळ, रब्बी व उन्हाळी पिकांना बसलेला अवकाळी पावसासह वादळवाºयाचा फटका याला तोंड देताना बळीराजा मेटाकुटीस आल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. कापूस विक्रीची नोंद करुनही विक्रीचा मुहूर्त लवकर साधला जात नाही. अतिवृष्टीमुळे सोयाबिन, ज्वारी, तूर, उडीद, मुग आदी पिकांची मोठी हाणी झाली. उभ्या कापसाच्या सरकीला अंकुर फुटले. ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिक गर्तेत सापडला. त्याननंतर कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संचारबंदीचा फटका भाजीपाला, उत्पादकांना बसला. थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाचा गुंता अद्यापही कायम असल्याने खरिपाचे पीक कर्ज वाटप अद्यापही प्रलंबित आहे. त्यात अनुदानावर खते, बियाणे मिळण्याची आशा धुसर दिसत असताना बियाणे दरात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. गतवर्षी सोयाबीन बियाणे विविध वाणाची बॅग, एक हजार ७०० रुपये ते एक हजार ९०० पन्नास रुपयांपर्यंत होती, तर यावर्षी दोन हजार २०० ते दोन हजार ६०० रुपये प्रती बॅगचे दर असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी उडीद, मूग, बियाणे प्रती किलो १२० रुपये होते. यंदा मात्र हे बियाणे प्रती किलो १८० रुपयांपर्यंत वाढले आहे, तर तुरीच्या बियाणातसुद्धा ३० ते ४० रुपये प्रती किलो भाववाढ झाल्याचे समजते.ओलावा झाल्यानंतरच पेरणी करांदिवसांपासून वातावरणात बदल होताना दिसत आहे. त्यामुळे हवामान खात्याने जरी पावसाचा अंदाज बांधला असला तरी पाऊस कधी येईल, हे सांगणे अवघड आहे. वेळेवर पाऊस आला तर शेतकऱ्यांना सुरळीत पेरणी करता येणार आहे. त्यासाठी शेतकºयांनी चांगला ओलावा झाल्यानंतरच पेरणी करावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षाचांगला पाऊस झाला की, लगेच खरिपाची पेरणी करावी, असा विचार शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यात खरिपाची पेरणी करावी, असा समाधानकारक पाऊसच झाला नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा कोरोना काळात देखील शेतकºयांनी उन्हाळ्यात खरीप लागवडीच्या पूर्वतयारीची सर्व कामे पूर्ण केली आहेत. लॉकडाऊनमुळे मशागतीची कामे थांबली होती. काही दिवसानंतर जिल्हा प्रशासनाने शेतीच्या कामांना मुभा दिल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. सध्या जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी काही ठिकाणी पाऊस झाला आहे. या पावसाने जमीन एक फूट पण भिजेल इतकाही पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे नजरा लावून बसले आहेत. चांगला पाऊस झाल्यानंतरच खरिपाची पेरणी करता येणार आहे. यंदा जरी हवामान खात्याने चांगला पाऊस असल्याचे सांगितले असले तरी ऐनवेळी वाऱ्यांमुळे पाऊस पुढे जात आहे. वातावरणामध्ये सारखा बदल होत आहे. मात्र, पाऊस येईल, असे वातावरण निर्माण होत नाही आहे.
बियाणे दरवाढीने शेतकरी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 5:00 AM
गतवर्षी खरीप पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, ओला दुष्काळ, रब्बी व उन्हाळी पिकांना बसलेला अवकाळी पावसासह वादळवाºयाचा फटका याला तोंड देताना बळीराजा मेटाकुटीस आल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. कापूस विक्रीची नोंद करुनही विक्रीचा मुहूर्त लवकर साधला जात नाही. अतिवृष्टीमुळे सोयाबिन, ज्वारी, तूर, उडीद, मुग आदी पिकांची मोठी हाणी झाली. उभ्या कापसाच्या सरकीला अंकुर फुटले.
ठळक मुद्देआर्थिक ताण : मागील वर्षीच्या तुलनेत बियाण्यांच्या दरात वाढ