शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

कर्जाचे ओझे घेऊन शेतकरी नव्या हंगामासाठी सज्ज

By admin | Published: June 04, 2016 12:52 AM

डोक्यावर कर्ज आहे म्हणून रडायचे नसते. काळ्या मातीची सेवा सोडायची नसते. निसर्ग कितीही कोपला तरीही

कर्ज पुनर्गठनाची प्रतीक्षा : पेरणीसाठी बियाणांची जुळवाजुळवसावली : डोक्यावर कर्ज आहे म्हणून रडायचे नसते. काळ्या मातीची सेवा सोडायची नसते. निसर्ग कितीही कोपला तरीही एक दिवस सोनेरी पहाट उगवेल या आशेने कितीही दुष्काळ पडला तरी धान उत्पादक शेतकरी दरवर्षी नव्या हंगामासाठी तयार असतो. सध्या पेरणीपूर्व हंगाम सुरू असून भर उन्हात शेतात काम सुरू आहेत.अल्प पावसामुळे मागील वर्षी धानाचे उत्पादन अतिशय कमी झाले होते. बियाण्यांचा दर्जाही घसरला होता. त्यामुळे या हंगामात नविन बि-बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. कृषी केंद्रात नवनवीन कंपन्यांचे बियाणे उपलब्ध झाले आहेत. महागडे बियाणे घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू आहे. काही शेतकरी इतर शेतकऱ्याकडून उसणवारीने बियाणे घेत आहेत.(शहर प्रतिनिधी)गोसेखुर्दचे पाणी सोडण्याची मागणीकाही दिवसातच पऱ्हे लावण्याचा हंगाम सुरू होणार आहे. वेळेवर रोवणी झाली तर उत्पादन वाढू शकते. शेतकऱ्याला अधिकचे पैसे मिळू शकतात. त्यामुळे आतापासून आसोला तलावात पाणी सोडणे गरजेचे आहे. गराडी नाल्याचे काम पूर्ण न झाल्याने मागील वर्षी पाईपने पाणी टाकण्यात आले. पाणी उशिरा आल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. पाईपमधून पाणी दिल्यास चार महिने तलाव भरण्यासाठी लागतात. त्यामुळे आतापासून पाणी सोडणे हितकारक ठरणार आहे. तसेच पावसाचे पाणीसुद्धा तलावात जमा होईल. साहजिकच आसोला तलाव भरण्यास वेळ लागणार नाही. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा अगोदरच नियोजन करणे गरजेचे आहे. या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनीसुद्धा आढावा बैठकीत पाणी समस्या सोडण्याबाबत सकारात्मक उत्तरे दिलीत.२०१२ पासूनचे कर्ज पुनर्गठनाची मागणीसरकारने २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५ चे कर्ज पुनगर्ठन करण्याचे आदेश दिले. पण सरकारी बँका, सेवा सहकारी संस्था २०१५ चे कर्ज पुनर्गठनला प्राधान्य देत असल्याने २०१२ पासूनचे थकीत शेतकऱ्यांना वाट बघावी लागत आहे. यावर्षी दुष्काळी मदत, पीक विमा न मिळाल्याने जिल्ह्यातील कास्तकार हवालदिल झाला आहे. त्यामुळे नविन हंगामासाठी थकीत कर्जधारक शेतकऱ्यांनासुद्धा सरसकट कर्ज देण्याची मागणी जोर धरत आहे.रोजगार हमीने दिला आधारसावली नगरपंचायत झाल्याने यावर्षी सावलीतील मजुरांना कामे मिळाले नाही पण इतर गावात मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते रोजगार हमीचे कामे झाल्याने दुष्काळग्रस्त शेतकरी, मजुर यांना रोजगार मिळाला. या कामातून पावसाळ्याची थोडी व्यवस्था मजूर वर्गाची झाली आहे. उन्हाळी धानपिकामुळे पाथरी गावातील शेतकरी, मजुरांना आधार मिळाला.