शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

अन् शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोरच चक्क खत खाऊन दाखवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:29 AM

अमोद गौरकार शंकरपूर : येथील दत्त कृषी केंद्रातून बोगस खताची विक्री केल्याच्या तक्रारी जिल्हा कृषी अधिकारी व इतर कार्यालयात ...

अमोद गौरकार

शंकरपूर : येथील दत्त कृषी केंद्रातून बोगस खताची विक्री केल्याच्या तक्रारी जिल्हा कृषी अधिकारी व इतर कार्यालयात करण्यात आल्या आहेत. त्यानंतर गुरुवारी चंद्रपूर येथील कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमक्ष दत्त कृषी केंद्राची चौकशी केली असून, येथील खताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. विशेष म्हणजे, खताच्या नावाखाली चुना आणि मातीचे मिश्रण विकले जात असल्याचे सांगत काही शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसमोर हे खत खाऊन दाखवले.

यावेळी शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या शिल्लक खतासोबत बिल पावती दत्त कृषी केंद्रामध्ये आणायला लावली. त्या खतांचेही नमुने घेऊन तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. या कार्यवाहीची एक प्रत शेतकऱ्यांकडेही देण्यात आली आहे. यावेळी चौकशी करताना तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे उपस्थित होते, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी सहारे यांना उपस्थित राहण्याकरिता सूचना केली. मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त केला.

बॉक्स

कृषी केंद्रातील गडबडी

काही शेतकऱ्यांना कृषी संचालक राजू वैद्य यांनी कच्चे बिल दिले तर काही शेतकऱ्यांना पक्के बिल दिल्याचे यावेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्या नंबरचे बिल बुक तपासले असता, त्या क्रमांकाची डुप्लिकेट बिले फाडल्याचे निदर्शनास आले. खताच्या बॅगचे वजन केले असता, ती बॅग आठ किलोने कमी असल्याने हे खत कंपनीचे नसून कुठेतरी पॅकिंग केले असावे, असे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. या खतामध्ये कोणतेही रासायनिक द्रव्य नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर हे खत खाऊन दाखवले. त्यामध्ये चुना आणि मातीचे मिश्रण असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते.

कोट

मी शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे असलेल्या खताचे नमुने याठिकाणी घेतले असून, कृषी महाविद्यालय, अमरावती येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले आहेत. खतांच्या नमुन्यांचा अहवाल आल्यावर अहवालाची प्रत शेतकऱ्यांना देण्यात येईल व योग्य ती कारवाई करण्यात येईल.

- प्रशांत मडावी

जिल्हा कृषी पर्यवेक्षक, चंद्रपूर