शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:25 AM

एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले. सूर्याचा हा प्रकोप मे महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत कायमच आहे. पारा सतत ४५ अंशापार जात आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावशिवार व जंगललगातचा परिसर ओसाड पडला आहे.

ठळक मुद्देतजवीज करताना जीव मेटाकुटीस : चाºया-पाण्याविना कसे जगवावे पशुधन ?, शेतकऱ्यांसमोर बिकट प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एप्रिल महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात सूर्याने आग ओकणे सुरू केले. सूर्याचा हा प्रकोप मे महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत कायमच आहे. पारा सतत ४५ अंशापार जात आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यामुळे गावशिवार व जंगललगातचा परिसर ओसाड पडला आहे. परिणामी जनावरांच्या चाऱ्यांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना आपले पशुधन जगविण्यासाठी चारा दुकानातून विकत घ्यावा लागत आहे. यामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकºयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. डिसेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला होता. फेब्रुवारी, मार्च महिन्यात तर स्थिती आणखी बिकट झाली होती. नलेश्वर, चंदई, लभानसराड यासह आणखी दोन प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. नदी, नाले, तलाव, बोड्या हे ग्रामीण भागातील जलस्रोत चिंताजनक स्थितीत आले आहे. पाण्याची स्थिती नाजुकच आहे. ग्रामीण भागातील जलस्रोत आटले आहेत. नदी-नाल्यांसोबतच नागरिकांच्या घरातील विहिरी, बोअरवेल यांचेही पाणी कमी झाले आहे. एकूणच पाण्याची पातळीच खोल गेल्याने याचा सर्व जलस्रोतांवर परिणाम झाला आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील परिसर पहाडी भाग आहे. या परिसरातील अनेक गावात पाणी नाही. आदिवासींचे गुडे पाण्याविना टाहो फोडत आहे. जिवती, कोरपना, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, भद्रावती, वरोरा, गोंडपिपरी, पोंभूर्णा, सिंदेवाही यासह जवळजवळ संपूर्ण तालुक्यातच जलसाठ्यांची स्थिती भयावह आहे.जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने भूईला भेगा पडू लागल्या आहे. त्यामुळे जमिनीवर गवत व इतर तृण नाही. परिणामी गावशिवारात व जंगलालगतच कुठेही जनावरांचा चारा दिसून येत नाही. शेतकरी आपल्या जनावरांना शेतशिवारात किंवा जंगलालगतच्या परिसरात, जिथे पाण्याचे स्रोत आहे, तिथे चराईसाठी सोडायचे. मात्र आता चाराही नाही आणि बोडी, तलाव यासारखे जलस्रोतही आटले आहे. त्यामुळे जनावरांना घरातील गोठ्यातच ठेवून चारा विकत आणून त्यांना द्यावा लागत आहे.हंगाम तोंडावर; हातचा पैसा चाऱ्यावर खर्चशेतकऱ्यांचा खरीप हंगात अगदी तोंडावर आला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांना हंगामासाठी जुळवाजुळव केलेला पैसा चाऱ्यावर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे हंगामासाठी खत, बियाणे यांची तजवीज कशी करावी, असाही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.वैतागून पशुधनाची विक्रीचारा आणि पाणी टंचाईमुळे शेतकरी वैतागले आहे. पशुधन जगविण्यासाठी हंगामासाठी ठेवलेला पैसा खर्च होत आहे. त्यामुळे नाईलाजाने अनेक शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी बैलबाजारात नेत आहेत. जनावारांना विकून पावसाळ्यात पुन्हा जनावरे खरेदी करायचे, असा निर्णय अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे.पाण्याचा प्रश्न बिकटचाºयासोबत जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. नदी, तलाव, बोड्या यात पाणी नसल्याने जनावरांना पाण्यासाठी कुठे सोडावे, असा प्रश्न शेतकºयांना भेडसावत आहे. हातपंप, विहिरींनाही पाणी नाही. जिथे पाणी असेल तेथून बैलबंडीवर पाणी आणून जनावरांना पाजावे लागत आहे. यात शेतकरी मोटाकुटीस आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी