वनौषधीची शेती करावी : अनेक शेतकऱ्यांची उपस्थितीबाखर्डी : स्वदेशी महासंघाच्या वतीने राजूरा येथील किसान भवनात शनिवारला सकाळी ११ वाजता शेतकरी मेळावा पार पडला. सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अरूण धोटे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वदेशी महासंघाचे अॅड कांचन कोतवाल तर प्रमुख पाहुणे राष्ट्रीय संचालक रत्नाकर हजारे, जिल्हा रा.सं महासंघाचे प्रमोद अलोने, रा.सं महासंघाचे अभय ढेंगे, प्रा.उमेश राजुरकर आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना अॅड कांचन कोतवाल म्हणाले, शेतमालाला पुरेसा भाव मिळत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय नेहमीच तोट्यात येतो. याचे मुख्य कारण देशात धानाचे उत्पादन गरजेपेक्षा तिन पट होते. आणि भाव मागणी पुरवठयाच्या सिद्धांतानुसार ठरवीले जातात. सेंद्रीय खताच्यासह्याने पिकवलेल्या धान्याला देशात व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. पण विदर्भातील शेतकरी मात्र रासायनिक खताच्या सह्याने शेती करतात. सेद्रीय विषमुक्त शेती केल्यास योग्य भाव मिळू शकतो. व त्याद्वारे शेतकरी समृद्ध होऊ शकतो. याच उद्देशाने शेतकऱ्यांची उन्नती व्हावी, याकरिता स्वदेशी महासंघाची स्थापना झाली. स्वदेशी महासंघ शेती ही भाडे तत्त्वावर घेतो व वनऔषधीची लागवड करतो, त्याकरिता शेतकऱ्यांना वरपाणी कोरडवाहू शेती १५ हजार रूपये, कोरडवाहू जमिनीसाठी २५ हजार रूपये, तर बारमाही ओलीतासाठी ५० हजार रूपये प्रती एकरी एक वर्षासाठी देण्यात येते. तसेच शेतकऱ्यांना शेतीत काम करण्याची संधी पण दिली जाते. त्यासाठी त्यांना मासिक वेतन व मानधन देण्यात येते. याकरिता महासंघाने मोठी फळी उभी केली आहे. त्यामुळे गावं खेड्यातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असे वक्तव्य केले.यावेळी राष्ट्रीय संचालक प्रमोद अलोने म्हणाले, सध्या संपूर्ण देशातच नाही तर जगात आयुर्वेदिक औषधीची मागणी मोठया प्रमाणात आहे. परंतु त्यांचा पुरवठा अत्यल्प आहे. जर शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बदलून औषधी शेती केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक चित्र बदलू शकते.अध्यक्षीय भाषणामध्ये अरूण धोटे म्हणाले, वनोऔषधी शेती ही स्वदेशी महासंघाद्वारे आलेली एक सुवर्ण संधी आहे. यामुळे मोठी क्रांती घडू शकते. परंतु शेतकऱ्यांनी शेती ठेक्याने देऊन आळशी बनू नये, तर स्वत: महासंघाशी जुळून शेतीत राबावे व आपली उन्नती करावी, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रत्नाकर हजारे यांनी केले. तर आभार सुरेश लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नामदेव डाहूले, राजु चिलमंतलवार, शेषराव धाबेकर, वासुदेव येरगुडे, राजकुमार रामटेके, रविंद्र थेरे, आशिष मोहुलेॅ श्रीकांत लोडे यांनी सहकार्य केले यावेळी राजुरा, बल्लारशा, गोंडपिंपरी, जिवती, कोरपना तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
शेतकरी महासंघाचा शेतकरी मेळावा
By admin | Published: January 16, 2017 12:44 AM