राकेश बोरकुंडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देऊ केलेली कर्जमाफी जाचक अटींमुळे व खंडीत लिंकसेवेमुळे शेतकºयांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. आधीच शेतीकामात व्यस्त असलेला शेतकरी अशा उफराट्या कामामुळे बेजार झाला आहे.कर्जमाफीकरिता शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरून द्यावयाचा आहे. हा अर्ज एक तर इंटरनेट कॅफे किंवा शासन नियुक्त ग्रामदूत, सुविधा केंद्रातून भरावयाचा आहे. त्याकरिता शेतकरी दाम्पत्यालाच सुविधा केंद्रावर यावे लागते. दोघांचेही आधार कार्ड व बँक बचत खात्याच्या पासबुकांची छायांकित प्रत सोबत आणावी लागते. शहरात आॅनलाईन सेवा नेहमीच विस्कळीत असते. गेल्या काही आठवड्यापासून दर आठवड्यात दोन ते तीन दिवस ही सेवा ठप्प असते. ग्रामीण भागातून कर्जमाफीचा अर्ज भरण्याकरिता येणाºया शेतकºयांना लिंक नाही, असे सांगण्यात आल्यावर त्या शेतकºयांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. लिंक सुरू होईल, या आशेवर तो संपूर्ण दिवस रांगेत असतो. अखेर अर्ज न भरताच गावाला जावे लागते. त्यामुळे येण्या जाण्याचा नाहक भुर्दंड शेतकºयांना सोसावा लागत आहे. दिवसभरात ग्रामदूत व सुविधा केंद्रावरून काम न झाल्याने निराश होवून परत जाणाºया शेतकºयांची संख्या वाढली असल्याची दिसते. काही शेतकºयांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या. पण तहसीलदार याकडे लक्ष द्यायला तयार नाही.विशेष म्हणजे, शासकीय यंत्रणाच प्रभावी नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. सेतू केंद्र बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना सर्वात जास्त फटका बसत आहे. छोट्या-छोट्या कामासाठी आॅनलाईन केंद्रात जावून त्या कागदाची पुर्तता करावी लागत असल्याने नागरिकांचा सरकार व प्रशासनावर रोष वाढत असल्याचे तालुक्यात दिसत आहे. याबाबत राजकीय पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधीसुद्धा उदासीन दिसत आहे.
खंडीत लिंकसेवेमुळे शेतकरी बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 11:58 PM
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देऊ केलेली कर्जमाफी जाचक अटींमुळे व खंडीत लिंकसेवेमुळे शेतकºयांसाठी डोकेदुखीची ठरत आहे.
ठळक मुद्देतक्रारीनंतरही तहसीलदारांचे दुर्लक्ष : शेतकºयांसाठी कर्जमाफी की डोकेदुखी?