लोकमत न्यूज नेटवर्कसावली : मागीलवर्षी कोरडा दुष्काळ, मावा व तुळतुळा या रोगामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी अत्यल्प उत्पादन झाले. तरीसुद्धा सावली तालुक्याला पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी तहसीलवर धडक दिली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.ओबिसींचे आरक्षण २७ टक्के असताना वैद्यकीय प्रवेशात फक्त दोन टक्के आरक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आरक्षण द्यावे, शेतकऱ्यांची सरकट कर्जमाफी करावी, ज्या शेतकऱ्यांनी सन २०१५-२०१६ मध्ये कर्ज घेतले. त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना मार्च २०१७ पर्यंतचे कर्ज माफ करावे, कृषी पंपासाठी शेतकऱ्यांनी वीज मंडळाकडे पैसे भरले. मात्र दोन वर्षांपासून त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत.त्यांना वीज पुरवठा देण्यात यावा, कृषी पंपाचे विजबिल माफ करावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, विज मंडळाने ग्राम विद्युत सेवकांचा प्रस्ताव ग्रामपंचायतकडून मागितला मात्र विद्युत सेवक अजूनही नेमण्यात आले नाही. परिणामी दुर्घटना घडत असल्याने विद्युत सेवकांची नियुक्ती करावी आदी मागण्यासाठी नगरपंचायत पटांगणातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चाला संबोधित करताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, पीक विम्याच्या नावाखाली शेतकºयांंकडून पैसे वसूल करण्यात येतात. मात्र नुकसान भरपाई दिल्या जात नाही. हा केवळ कंपन्यांचा फायदा करण्याचे धोरण सरकारने आखले आहे. हे खोटारडे सरकार असून यांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. तर माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांनी शेतकऱ्यांना १५ लाख देण्यापेक्षा हक्काची पीकविम्याची रक्कम द्यावी अशी मागणी केली.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महीला आघाडीच्या राज्य सचिव नंदा अल्लूरवार, माजी जि.प. सदस्य दिनेश चिटनूरवार, जि. प. सदस्य वैशाली शेरकी, नगराध्यक्ष विलास यासलवार, तालुका अध्यक्ष यशवंत बोरकुटे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषा भोयर, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजेश सिध्दम, पंचायत समिती सदस्य विजय कोरेवार, मनिषा जवादे, उर्मिला तरारे, संगिता चौधरी, राकेश गड्डमवार, शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले, युवक अध्यक्ष नितीन दुव्वावार, यांच्यासह शेकडो शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांची तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 11:04 PM
मागीलवर्षी कोरडा दुष्काळ, मावा व तुळतुळा या रोगामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी अत्यल्प उत्पादन झाले. तरीसुद्धा सावली तालुक्याला पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व : पीक विमा देण्याची मागणी