शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

आधारभूत धान्य खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 4:44 AM

ब्रम्हपुरी : केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमतीवर धान्य खरेदीसाठी १८६३ रुपये हमीभाव जाहीर केला असल्याने तसेच राज्य सरकारने ७०० ...

ब्रम्हपुरी : केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमतीवर धान्य खरेदीसाठी १८६३ रुपये हमीभाव जाहीर केला असल्याने तसेच राज्य सरकारने ७०० रुपये बोनस जाहीर केल्याने शेतकºयांना एकूण दोन हजार ५६३ रुपये भाव शासनदरबारी मिळतो. खासगी व्यापाऱ्यांकडे तेवढा भाव मिळत नसल्याने शेतकरी स्वत:चे धान विक्रीसाठी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर नेण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमधून टोकण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे धान विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून सातबारा देऊन टोकण घेऊन नंबर लावावा लागतो. मात्र ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनागोंदी कारभारामुळे तसेच ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना रोजी-रोटी, तसेच दैनंदिन कामे बाजूला सारून दररोज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चकरा माराव्या लागत आहेत. शेतकऱ्यांना पिकवलेले धान विकण्यासाठी व बाजार समितीमधून टोकण घेण्यासाठी चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांचे सातबारे गहाळ

१७ नोव्हेंबरपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत सातबारा जमा करूनही आजतागायत बहुतांश शेतकऱ्यांना टोकण न मिळाल्याने तसेच काही शेतकºयांचे सातबारे गहाळ झाले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा गलथानपणा उघड होत आहे.

बॉक्स

अनेक ठिकाणी केंद्र सुरू

ब्रम्हपुरी तालुक्यातील ब्रम्हपुरी, अऱ्हेर-नवरगाव, पिंपळगाव(भो), चौगान, बरडकिन्ही, आवळगाव आदी ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. आणि सदर केंद्रांना जवळपासची गावे जोडण्यात आली असून त्या ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नेऊन आपले धान विकायचे आहेत. मात्र त्याआधी संबंधित शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत सातबारा जमा करून टोकण घ्यावी लागते. टोकण मिळाल्यानंतर दिलेल्या दिवशी आपल्या धानाचा काटा करायचा असतो.