हा शेतकरी गुरे चारण्यासाठी लागूनच असलेल्या कढोली नाल्याकडे गेला होता. नाल्यात गुरे धुण्यासाठी उतरला असता अचानक त्याच्यावर मगरीने हल्ला केला. पाण्यातील खळबळ पाहून बैल बाहेर निघाले. मात्र महादेव मगरीच्या तावडीतून सुटका करून घेण्यास यशस्वी झाला; पण त्याच्या मानेला मगरीचे दात रुतल्याने जखम झालेली आहे. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पावसाळा सुरू असल्याने वैनगंगा नदीला पुराची परिस्थिती निर्माण होऊन पाण्याचा प्रवाह वाढत आहे. त्यामुळे कढोली येथील नाल्यापर्यंत पाणी आल्याने नदीच्या प्रवाहातून मगर आली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जखमी शेतकऱ्याला लोंढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत कुणीही अधिकारी घटनास्थळी आलेले नव्हते. जखमीला नंतर पुढील उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
200821\img-20210820-wa0199.jpg
जखमी गुराखी