प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मागील वर्षी कपाशीवरील बोंडअळीने थैमान घातल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले होते. बोंडअळीने हजारो हेक्टरवरील कपाशीला प्रचंड फटका बसला. यावर्षी तर सुरुवातीपासूनच पिकावर बोंडअळी आल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांच्या कपाशीवर बोंडअळी दिसून येत असल्याने शेतकरी प्रचंड हादरले आहेत.मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यालाच नाही तर अख्या महाराष्टÑात बोंडअळीने थैमान घातले होते. बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केल्याने त्याचा मोठा फटका बसला होता. कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. कापूस पिकावरच शेतकºयांची आर्थिक धुरा अवलंबून आहे.बोंडअळीने गेल्या वर्षी पांढरे सोने उद्ध्वस्त झाले. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे शेतकºयांनी पिकावर केलेला खर्चही भरुन निघाला नाही. यावर्षी खरीपाच्या सुरुवातीपासूनच बोंडअळी असल्याची चर्चा असून बोंडअळीला प्रतिबंध म्हणून शेतकरी विविध उपाययोजना करताना दिसतात.या वर्षीही बोंडअळीचा मोठा विपरीत परिणाम कपाशी पिकावर होण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते.राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा तालुके कापूस पिकासाठी अग्रेसर मानले जातात. या तालुक्यात पांढरे सोने म्हणून कापूस पिकाला सर्वाधिक पसंती दिली जाते. कापूस नगदी पीक असल्याने सारी भिस्त कापसावर अवलंबून आहे. परंतु, यावर्षी सुरुवातीपासूनच बोंडअळी पतंग आल्याने कपाशीचे पीक यावर्षीही उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कपाशीवरील बोंडअळीने शेतकरी हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:00 AM
मागील वर्षी कपाशीवरील बोंडअळीने थैमान घातल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले होते. बोंडअळीने हजारो हेक्टरवरील कपाशीला प्रचंड फटका बसला. यावर्षी तर सुरुवातीपासूनच पिकावर बोंडअळी आल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांच्या कपाशीवर बोंडअळी दिसून येत असल्याने शेतकरी प्रचंड हादरले आहेत.
ठळक मुद्देचिंतेचे वातावरण : पीक उद्ध्वस्त होण्याच्या धोका