व्यक्तीगत, किंवा समाजात वावरताना राग, मत्सर, हेवेदावे यामुळे आपले तर नुकसान होतेच; शिवाय सामाजिक आरोग्यही बाधित होते. मकरसंक्रांत म्हणजे राग, द्वेश, मत्सर दूर सारून गोड व सकारात्मक बोलत आनंदमय व निरोगी आयुष्य जगणे. शेतकरी आज हताश झाला आहे. नापिकीमुळे त्रस्त झाला आहे. मात्र शेतकऱ्यांनी हताश होऊ नये. शेतात अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. त्याचा स्वीकार करावा. एकटेपणात विचारमग्न राहण्यापेक्षा इतर शेतकऱ्यांसोबत मोकळ्या मनाने चर्चा करावी. यातून त्यांची जीवनपध्दती निश्चितच सकारात्मक होईल, असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी मकरसंक्रांतीनिमित्त ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.शेतकरी दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतो. काबाडकष्ट केल्यानंतर फलश्रुती अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर तो चिडतो. हा राग मग इतरांवर निघतो. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी सामूहिक चर्चा करावी. शेतात शक्य असेल तर एकत्र आपापले डब्बे खावे. अशावेळी प्रगतशिल शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. असे झाले तर निश्चितच शेतकऱ्यांमधी नकारात्मक भावना निघेल. शेतातही त्यांना अनेक पर्याय उपलब्ध होईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.सध्या धावपळीचे आणि स्पर्धेचे यूग आहे. टेन्शन आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही मेंदू शक्यतो शांत ठेवावा. आहारात फळे, पालेभाज्या घ्याव्या. यातून त्यांचा, सोबतच शेतकऱ्यांचाही फायदा होईल, असे डॉ. पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांनी सामूहिक चर्चा करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:56 PM
व्यक्तीगत, किंवा समाजात वावरताना राग, मत्सर, हेवेदावे यामुळे आपले तर नुकसान होतेच; शिवाय सामाजिक आरोग्यही बाधित होते. मकरसंक्रांत म्हणजे राग, द्वेश, मत्सर दूर सारून गोड व सकारात्मक बोलत आनंदमय व निरोगी आयुष्य जगणे. शेतकरी आज हताश झाला आहे. नापिकीमुळे त्रस्त झाला आहे.
ठळक मुद्देपर्याय अनेक आहेत; हताश होऊ नका