लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगाम सुरू झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाच्या सरी पडत आहेत. मात्र अजुनही शेतजमिनीची दाहकता कमी झालेली नाही. जोपर्यंत शेतजमीन वितभर ओलीचिंब होणार नाही, तोपर्यंत शेतकºयांनी खरीपाची पेरणी करू नये, असे आवाहन शेती तज्ज्ञांनी केले आहे.रोहिणी नक्षत्र सुरू झाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल धुळ पेरणीकडे असतो. अती उष्णतेत धूळ पेरणी केल्याने बियाणे नष्ट होतात. शिवाय शेतजमीन ओली नसल्याने पाखराचे थवेही शेतजमिनीवरील बियाणे खाऊन फस्त करतात. अशावेळी दुबारपेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येते.महागडी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांवर अधिकचा भार सहन करावा लागतो. त्यामुळे मान्सुनच्या सरी येत असल्या तरी शेतजमीन वितभर ओलीचिंब झाल्याशिवाय खरीप हंगामातील पिकांच्या बियाण्याची पेरणी करू नये. विशेषत: कोरडवाहू शेतकºयांसाठी धूळ फेकणी धोक्याची घंटा ठरतात.चंद्रपूरची ओळख धान उत्पादक जिल्हा अशी असली तरी जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकेही घेतली जाते. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता यावर्षी शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळेल, असे मतही व्यक्त केले जात आहे.नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संतापचंद्रपूर : खरिप हंगाम सुरू झाला असून अद्यापही काही शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज मिळाले नाही. त्यामुळे या हंगामात बी-बियाणे, खते आणायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या शेतकरी बियाण्याच्या तडजोडीकरिता धडपडत आहे. शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होतात. मात्र, यावर्षी कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे जून महिना आला तरीही काही शेतकऱ्यांना पीककर्ज मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे, दरवर्षी पीक कर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च राहत. यावर्षी ३१ मे पर्यंत वाढवून देण्यात आली होती. यावर्षी कृषीकेंद्र संचालकही उधारीवर बी-बियाणे व खते द्यायच्या मनस्थितीत नाही. राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला गेला. मात्र सदर कर्ज माफी ही थकित शेतकऱ्यांसाठी असल्याने नियमित कर्ज भरणाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळत आहे.पावसाची शक्यतामागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मान्सूनची वाटचाल सुरू झाली असून हवामान खात्याने ५ जूनपर्यंत विदर्भात वादळी वाºयासह पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. हा अंदाज खरा ठरतो की खोटा, याची खात्री करूनच खरीपाच्या पेरणीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढभाववाढीच्या प्रतीक्षेत साठवून ठेवलेला कापूस अद्यापही घरातच असताना रोहिणीच्या सरी बरसल्या आहे. त्यामुळे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. कापूस घरात असतानाच शेतकऱ्यांना कपाशीची लागवड करावी लागत असल्याने आता घरातील कापूस सांभाळायचा की, शेतातील कपाशीची काळजी घ्यायची, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. अशातच रोहिणी नक्षत्रातच पावसाच्या हजेरी लावल्याने काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता भरपूर पाऊस पडू द्यावा. अनेकवेळा शेतकरी पेरणीसाठी घाई करतात. मान्सुनपूर्णपणे सक्रिय होण्यापूर्वीच पेरणी केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असते.-उदय पाटीलजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर
खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 5:00 AM
रोहिणी नक्षत्र सुरू झाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल धुळ पेरणीकडे असतो. अती उष्णतेत धूळ पेरणी केल्याने बियाणे नष्ट होतात. शिवाय शेतजमीन ओली नसल्याने पाखराचे थवेही शेतजमिनीवरील बियाणे खाऊन फस्त करतात. अशावेळी दुबारपेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येते.
ठळक मुद्देशेतकरी सज्ज : जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता