शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
3
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
4
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
5
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
6
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
7
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
8
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
9
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
10
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
12
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
13
अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात, संतापून म्हणाले, 'काहीही फो़डू शकतो...'; अंकिताची दाखवली 'ही' चूक
14
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
15
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
16
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
17
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
18
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
19
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
20
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर

शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:45 PM

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे बरेच नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून विमा अर्ज व रक्कम भरलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी या काळामध्ये तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंवा संबंधित पिक विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी : प्रधानमंत्री पीक विमा योजना नुकसानीसाठीही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे बरेच नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून विमा अर्ज व रक्कम भरलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी या काळामध्ये तातडीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी किंवा संबंधित पिक विमा कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी केले आहे.प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील खरीप हंगाम २०१८ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील मुद्दा क्रमांक १०.५ मधील जलमय झालेल्या क्षेत्रातील नुकसानीच्या तरतुदीनुसार विमा देय आहे. विमा संरक्षित क्षेत्र जलमय होऊन नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पात्र ठरू शकतात. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जाहीर केल्या जाणाऱ्या नुकसानीच्या अधिसूचनेच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता रक्कम भरली आहे, किंवा ज्यांच्या खात्यातून विमा हप्ता रक्कम अदा करण्यात आलेली आहे, अशा शेतकरी बांधवांनी शासन निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही उदय पाटील यांनी केलेले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील कृषी व महसूल यंत्रणेने सतर्कतेने या योजनेचा लाभ मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील व अन्य कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचाºयांनी घटना घडल्यापासून ४८ ताससांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी किंवा विमा कंपनीचे जिल्हा व तालुकास्तरावरील प्रतिनिधी यांना देणे आवश्यक आहे. १८००२६६९७२५ टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांनी माहिती दिल्यास त्यांचा दावा ग्राह्य धरल्या जाऊ शकतो. यासाठी प्रयत्न करण्याबाबतही सतर्क राहण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व कृषी यंत्रणेला दिलेले आहेत.