आॅनलाईन लोकमतकावली (वसाड) : भारतीय शेतकऱ्यांनी हजारो वर्षांपासून शेतीचा विकास करण्यात व धान्याच्या नव्या प्रजाती शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. पूर्वीपासूनच शेतीला मानाचे स्थान असताना आधुनिक काळात ते मागे पडू लागले. शेतीचा विकास व्हावा, असे वाटत असेल तर शेतकऱ्यांनी पुढे यावे, असा सूर धामणगाव तालुक्यातील कावली येथे पार पडलेल्या किसान दिन कार्यक्रमातून शेतकरी व मान्यवरांनी काढला.कावली येथील लाभचंद मुलचंद राठी विद्यामंदिरात लाभचंदजी राठी, श्रीकृष्णदास राठी व चाले गुरूजी यांचा स्मृतीदिन ‘किसान दिन’ म्हणून नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यनारायण टावरी होते.यावेळी राजेश चांडक, प्रा. प्रफुल्ल कडू, सुरेंद्र बहातकर उपस्थित होते. दरम्यान शेतीनिष्ठ शेतकरी रमेश ढोले (कावली), अंबादास पडोळे (गव्हानिपाणी), कांचन ढोमणे (वसाड), जगदीश गोविंदराव महाजन (नारगवंडी) यांचा संस्थेचे सचिव यांनी शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये मोहिनी प्रकाश उईके हिला डॉ. ओंकारदास राठी पुरस्कार, प्रज्ज्वल भूषण पाचकवडे, जयश्री शंकरराव भोंगाडे, दर्शना श्रीधरराव भोंगाडे, श्रेया राजकुमार टाले यांचा गौरव करण्यात आला.यावेळी मुकुंद राठी, राजेश चांडक, प्रफुल्ल कडू, अंबादास पडोळे, जगदीश महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक सिद्धार्थ हेंडवे यांनी केले. संचालन ओंकार उंदरे व रेखा इंगळे यांनी, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रकाश वाहुरवाघ यांनी केले.कार्यक्रमाला श्रीराम पचारे, सुभाषराव मोरे, सुरेश बद्रे, शालिग्राम हिरुळकर, सरपंच नंदा कावरे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी, माता पालक संघ यांच्यासह शेतकरी, पालक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:05 PM
भारतीय शेतकऱ्यांनी हजारो वर्षांपासून शेतीचा विकास करण्यात व धान्याच्या नव्या प्रजाती शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
ठळक मुद्देकिसान दिन : शेतकरी, माजी सैनिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार