शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

उखर्डा येथील शेतकरी पुत्राने मंदिरात सुरू केली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 5:00 AM

शाळा सुरु नसल्यामुळे गावातील विद्यार्थी दिवसभर खेळण्यात मग्न आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी अभिजितने शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र जागेचा अभाव असल्यामुळे त्याने मंदिराच्या जागेची निवड केली. त्याच्या या प्रयत्नाला गावातील काही युवकांनीही सहकार्य केले.

ठळक मुद्देगावातील बेरोजगार युवकांची मदत : लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऑगस्ट महिना सुरु झाला असतानाही अद्यापही शाळा सुरु झाल्या नाही. त्यातच ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. मात्र हा अभ्यासक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच पालकांना आर्थिक दृष्ट्या संकटात टाकणारा ठरत आहे. त्यामुळे स्वप्रेरणेने जिल्ह्यातील काही युवकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. असाच प्रयत्न वरोरा तालुक्यातील उखर्डा येथील अभिजित प्रभाकर कुडे याने सुरु केला आहे. गावातील विद्यार्थ्यांना मंदिरात बोलावून तो विद्यार्जनाचे काम करीत आहे. यासाठी त्याला गावातील काही युवकही मदत करीत आहेत. त्याच्या या प्रयत्नाचे परिसरात कौतुक केले जात आहे.शाळा सुरु नसल्यामुळे गावातील विद्यार्थी दिवसभर खेळण्यात मग्न आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांचे नुकसान टाळण्यासाठी अभिजितने शाळा सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र जागेचा अभाव असल्यामुळे त्याने मंदिराच्या जागेची निवड केली. त्याच्या या प्रयत्नाला गावातील काही युवकांनीही सहकार्य केले. अभिजित हा वर्धा जिल्ह्यातील न्यु आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज वर्धा येथील पदवीचा विद्यार्थी आहे. लॉकडाऊनमुळे तो गावी परतला आहे.आपल्या शिक्षणाचा उपयोग गावातील विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी त्याने हा उपक्रम सुरु केला आहे. विद्यार्थ्यांना मंदिरात दुपारी ४ ते ७ वाजेपर्यंत शिकविण्याचे काम सुरु केले. यासाठी ३ वेगवेगच्या बॅच तयार केला. त्याला गावातील रंजीत कुडे, विनोद कोठारे, रोशन भोयर, ऋषिकेश कुडे, तेजस ऊरकुडे, अनिकेत राऊत, तुषार हे सुद्धा मदत करीत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे.उपक्रमासाठी अनेकांचे सहकार्यया उपक्रमासाठी न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना बूक, पेन, पेन्सिल तसेच शालेय दिले. यासाठी अमोल घोटेकर, रंजीत कुडे, रोशन भोयर, विनोद कोठारे, विजय कुडे यांनी आर्थिक मदत केली. तर सरपंच मना उईके व उपसरपंच विलास कुडे यांनीहीयासाठी प्रोत्साहन दिल्याने हा उपक्रम गावात चांगल्या प्रकारे सुरु आहे.विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांविद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण मिळावे यासाठी विविध प्रेरणादायी उपक्रमही राबविले जात आहे. विविध सामाजिक गोष्टी, गृहपाठ, शुध्द लेखनावर अधिक भर दिला जात आहे. सामाजिक जाणीव व्हावी यासाठी महापुरुषांची माहिती देवून विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे.लॉकडाऊनमुळे गावातील विद्यार्थ्यांची शाळा बंद आहे. त्यांना शाळेची सवय लागावी, विद्यार्थी इकडे-तिकडे भटकू नये यासाठी हनुमान मंदिरामध्ये गावातील काही युवकांनी शाळा सुरू केली आहे. यासाठी ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनीही त्याा युवकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे मंदिरातील शाळा सुरळीत सुरू आहे.-मना उईके,सरपंच, उखर्डा

टॅग्स :Schoolशाळा