शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
2
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण : अखेर डॉ. घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
3
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
4
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
5
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
8
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
9
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
10
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
11
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
12
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
13
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
14
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
15
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
16
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ
17
‘२.५ कोटी रुपये पगार असावा आणि...!’ भावी नवऱ्याकडून तरुणीच्या अपेक्षांची मोठी लिस्ट, व्हायरल पोस्ट चर्चेत
18
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
19
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
20
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय

शेतकऱ्यांनो, करडई पेरा आणि एकरी २२०० रुपये मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 05:00 IST

करडईचे क्षेत्र विस्तारणार आहे. बियाणासाठी जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८०० शेतकऱ्यांची नोंदणी केली.राज्यात तेलाचे उत्पादन कमी असल्याने ही गरज भागविण्यासाठी खाद्यतेल आयात केले जाते. विदर्भातील अन्य जिल्ह्यात करडई तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असताना यंदा जिल्ह्यात लागवड क्षेत्र वाढणार आहे. हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने कृषी विद्यापीठांनी करडई पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर देणे सुरू केले. या वर्षी पाऊस चांगला पडल्याने शेतकऱ्यांचा कल करडईकडे वाढला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी करडई पेरणीकडे पाठ फिरविली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : करडईत पोषकद्रव्ये अधिक आहेत. शिवाय कमी खर्चात हे पीक होत असून, सध्या दरही चांगला मिळत असताना यंदा रब्बी हंगामात महाज्योती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना बियाणे देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ओबीसी, व्हीजीएनटी, एसबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांना करडई लागवडीसाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रति एकर २२०० रुपये मिळणार आहेत.करडईचे क्षेत्र विस्तारणार आहे. बियाणासाठी जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८०० शेतकऱ्यांची नोंदणी केली.राज्यात तेलाचे उत्पादन कमी असल्याने ही गरज भागविण्यासाठी खाद्यतेल आयात केले जाते. विदर्भातील अन्य जिल्ह्यात करडई तेलबिया पिकाचे क्षेत्र कमी होत असताना यंदा जिल्ह्यात लागवड क्षेत्र वाढणार आहे. हे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने कृषी विद्यापीठांनी करडई पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर भर देणे सुरू केले. या वर्षी पाऊस चांगला पडल्याने शेतकऱ्यांचा कल करडईकडे वाढला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी करडई पेरणीकडे पाठ फिरविली. हे पीक काटेरी असल्याने काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत. हलक्या जमिनीत करडईची लागवड करता येते. करडईचे पीक एकाच जमिनीत सलग घेतले जाते. स्थानिक वाणांचा वापर, संकरित व सुधारित वाणांचे बियाणे सहज उपलब्ध न होणे, मावा किडीचे तसेच मर व करपा रोगाचे नियंत्रण वेळेवर न होणे, करडईची पेरणी उशिरा किंवा लवकर करणे, मजुरांचा अभाव बाजारभावातील लवचिकतेचा अभाव या कारणामुळे लागवड क्षेत्र घटले होते.

महाज्योती अभियानाचा आधारकरडईची पेरणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली असता रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान होते तर उशिरा म्हणजे ऑक्टोबरनंतर झाल्यास पिकाची कोवळी अवस्था थंडीत येऊन मावा कीड येते. करडईची पेरणी सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरच्या लागवडीसाठी करडईचे सुधारित वाणाचे प्रमाणित बियाणे निवडावे लागते.  महाज्योती अभियानाकडून शेतकऱ्यांना करडई लागवडीसाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून आधार मदत देण्यात येणार आहे. कृषी विभागाने पीडीकेव्ही पिंक, पीबीएनएस ८६, एकेएस २०७ आदी करडईचे बियाणे तातडीने पुरविण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

जिल्ह्यातील जमीन पोषक- करडई पिकासाठी मध्यम ते खोल भारी जमीन निवडावी. ६० सें.मी.पेक्षा जास्त खोल जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो. त्यामुळे करडई पीक चांगले येते. जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. पाणी साठून राहिल्यास पिकास अपाय होतो. करडई पीक काहीशा चोपण जमिनीतही होते. शेतकरी आता अधिक उत्पादन व अधिक फायदा मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. सध्या करडईला चांगला बाजारभाव आहे.

कोणाला मिळणार योजनेचा लाभ?

करडई बियाणे पेरणी करणाऱ्या ओबीसी, व्हीजीएनटी, एसबीसी प्रवर्गातील शेतकऱ्यांना करडई लागवडीसाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रति एकर २२०० रुपये मिळणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८०० शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे समजते.

 

टॅग्स :agricultureशेती