कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही?चंद्रपूर : मकरसंक्रांतीच्या दिवशी आपण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संकल्प करतो अन् आनंदाची देवाण-घेवाण करतो. पण या सणाच्या नावाखाली पतंगबाजीच्या उन्मादाने अनेकांना जखमी व्हावे लागते. मोठ्या शहरात तर पतंगबाजीमुळे अनेकांचा मृत्यूही होतो. आपल्या संस्कृतीचा आनंद साजरा करताना दुसऱ्याचे नुकसान करणे हे कुठेही सांगितलेले नाही. पण तरीही पतंगबाज रस्त्यांवर, घराच्या छतांवर अक्षरश: धुमाकूळ घालतात. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यांची आहे. पतंगबाजांचा हा उन्माद आणि मस्ती उतरविण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज आहे. तसेच त्यांना रस्त्यावर झोडपून काढण्यासाठी सामाजिक संघटनांच्या पुढाकाराची गरज आहे.प्रशासनाचा पुढाकार नाहीनायलॉन मांजाच्या धोका हा केवळ चंद्रपूर शहरापुरताच मर्यादित नसून ग्रामीण भागातीलही नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. लोकप्रतिनिधी व प्रशासनासोबतच सरकारने स्वत:हून यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने असे होताना दिसून येत नाही. लोकप्रतिनिधी हे चारचाकीशिवाय प्रवासच करीत नसल्याने त्यांना या धोक्याची कल्पनादेखील येत नाही. एरवी लहानसहान प्रकरणांत मोठी आंदोलने करणाऱ्या नेत्यांना रस्त्यांवरील हा मृत्यूचा धोका दिसत नाही का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.‘लोकमत’ची भूमिकामकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगबाजीच्या नावावर जो उन्माद सुरू होतो तो चीड आणणारा असतोे. या पतंगबाजीमुळे जे जखमी होतात, त्यांचे झालेले नुकसान कोणीही भरून काढू शकत नाही. आमचा पतंग उडविण्याला विरोध नाही. पतंग उडवीत असताना नायलॉनचा मांजा, काचेचा चुरा वापरणे या गोष्टींना आमचा विरोध आहे. ‘लोकमत’ची हीच भूमिका आहे. हा उन्माद असणाऱ्यांना आमचा विरोध आहे आणि ही विकृती थांबविण्यासाठी सामाजिक संघटना व नागरिकांनी समोर येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे. तरच अशा घटनांवर आळा घालता येऊ शकेल.दुचाकीस्वारांनो सावध राहापूर्वी घरांचे छत व मैदानांवरचा ‘ओ काट’ चा खेळ आता रस्त्यांवरही रंगतो. स्त्यावर आडव्या येणाऱ्या मांजाच्या रूपाने कोणत्याही क्षणी काळाची झडप वाहनचालकांवर बसू शकते. संक्रांतीच्या दिवशी याचे प्रत्यंतर नागरिकांना येते. शहरातील निरनिराळ्या भागात पतंगबाजीमुळे दुचाकीस्वारांनी वाहने हळू चालवावे. अनेक वाहनचालकांसमोर मांजामुळे अडचणी येणार आहे. विशेषत: तुकूम, बाबूपेठ, दुर्गापूर, बाजार वार्ड, आंध्रीया वॉर्ड, भानापेठ, भिवापूर,एकोरी वॉर्ड, पठाणपुरा, गंजवॉर्ड चंद्रपूर शहरातील या वॉर्डासह जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, मूल, ब्रह्मपुरी आदी शहरातील नागरिकांना मांजाचा फटका बसू शकतो.
जीवघेणा उन्माद
By admin | Published: January 13, 2015 10:55 PM