लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी: गोवरी-पोवनी या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाल्याने रस्त्यावरील खड्डेच आता नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी नागरिकांनी बांधकाम विभागाला अनेकदा निवेदन दिले. मात्र बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे.राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वसलेल्या कोळसा खदानीतील ओव्हरलोड वाहतुकीने अल्पावधीतच रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे. वाहतूकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवून जीवघेणी कोळसा वाहतूक केली जाते. भोयेगाव फाटा-गोवरी ते पोवनी या मुख्य मार्गावर ठिक ठिकाणी मोेठे खड्डे पडले आहे. खड्डयात दुचाकीस्वार पडून गंभीर जखमी झाल्याचा घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु, बांधकाम विभाग रस्त्यावरील खड्डे बूजवून रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे सौजन्य दाखवित नसल्याने अपघातचे प्रमाण वाढत आहे.खड्डयामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असते. रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, यासाठी अनेकदा नागरिकांनी लोकप्रतिनिधींची भेट घेतली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कोळसा खाणीतून दिवस रात्र होणारी ओव्हरलोड कोळसा वाहतूक रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत आहे. रस्त्याची क्षमता कमी असतांनाही त्या रस्त्यावर अवघड वाहने दिवस रात्र धावत असतात त्यामुळे अल्पावधीतच या रस्त्याची वाट लागली आहे.आमदारांनी लक्ष देण्याची मागणीगोवरी-पोवनी या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहे. याबाबते निवेदन परिसरातील नागरिकांनी स्थानिक आमदारांना देऊन रस्त्याच्या दुरूस्तीची चर्चाही केली. मात्र अजूनही रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाही. त्यामुळे आमदारांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
गोवरी-पोवनी मार्गावरुन नागरिकांचा जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:29 PM
गोवरी-पोवनी या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाल्याने रस्त्यावरील खड्डेच आता नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : खड्ड्यांमूळे अनेक अपघात