शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

भरकटलेले हरणाचे पिलू पोहोचले सुखरूप

By admin | Published: September 24, 2015 1:04 AM

आपल्या कळपातून भरकटून अगदी चंद्रपूर शहराजवळ पोहचलेले हरणाचे पिलू जागृत नागरिकांच्या समयसूचकतेमुळे सुखरूपपणे वनविभागाच्या कार्यालयात पोहोचले.

चंद्रपूर : आपल्या कळपातून भरकटून अगदी चंद्रपूर शहराजवळ पोहचलेले हरणाचे पिलू जागृत नागरिकांच्या समयसूचकतेमुळे सुखरूपपणे वनविभागाच्या कार्यालयात पोहोचले. बुधवारी दुपारच्या दरम्यान चंद्रपुरातील बिनबा गेटबाहेरील परिसरात एक हरणाचे पिलू घुटकाया परिसरात राहणारे आसिफ खान मकबूल खान यांना दिसले. हे पिलू एकटेच असल्याने आणि या परिसरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याने त्याचा जीव धोक्यात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वेळ न दडविता त्या पिलाला पकडले आणि आपल्या मित्राच्या मदतीने ते दुचाकीवरून वनविभागाच्या रामबाग नर्सरीत पोहचविले.दरम्यान, एका दुचाकीवरून हरिणाचे पिलू दोन व्यक्ती नेत असल्याची माहिती वनविभाग आणि पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्या दुचाकीचा शोध घेण्यासाठी यंत्रणा सज्ज होत असतानाच काही वेळातच खुद्द दोन दुचाकीस्वारच पिलासह रॅपिड रिस्पान्स युनिटच्या कार्यालयासमोर दाखल झाले. तिथे पिलू पोहचविल्यावर रॅपिड रिस्पान्स युनिटचे प्रमुख आणि आरएफओ आशिष हिवरे यांनी त्या पिल्याला ताब्यात घतले, आणि रेकॉर्डवर नोंद घेतली. सायंकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्या पिलूची तपासणी करून त्यानंतर त्याला ताडोबाच्या जंगलातील हरणांच्या पिलांच्या कळपात सोडणार असल्याचे आरएफओ आशिश हिवरे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी) पिलू पोहोचले दुचाकीवरूनआसिफ खान यांनी कसलाही वेळ न दडविता या पिल्याला आपल्या मित्राच्या मदतीने दुचाकीवरून वनविभागाच्या कार्यालयात पोहचविले. भर रस्त्यावरून दुचाकीवरून हरिणाचे पिलू नेले जात असल्याचे अनेकांच्या लक्षातच आले नाही. मात्र प्रस्तुत प्रतिनिधीच्या लक्षात ही बाब येताच जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक बी.जी. गरड यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या यंत्रणने दुचाकीच्या शोधासाठी तयारी सुरू करत असताना काही वेळातच दुचाकीसह पिलू वनविभागाच्या कर्यालयात पोहचले आणि सर्वांंचाच जीव भांड्यात पडला.