लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे सोमवारी कृषी दिनाचा कार्यक्रम मा. सा. कन्नमवार सभागृहात पार पडला. यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे तर मंचावर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अभियंता राहुल कर्डिले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जि. प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गोदावरी केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, उपविभागीय कृषी अधिकारी काळे, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे आदींची उपस्थिती होती. स्वागताध्यक्ष कृषी सभापती अर्चना नरेंद्र जीवतोडे होत्या. अध्यक्ष भोंगळे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कृषी विभाग कटीबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. सभापती अर्चना जीवतोडे म्हणाल्या, शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय, कुक्कुट पालन, शेळीपालन करून आर्थिक जीवनमान उंचवावे. मुख्य कार्यकारी अधिकारी कर्डिले यांनीही मार्गदर्शन केले. कृषी विकास अधिकरी शंकर किरवे यांनीही विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी मधूकर भलमे, शिवदास कोरे, रमेश क्षीरसागर या प्रगतशील शेतकºयांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी तर आभार कृषी अधिकारी राठोड यांनी मानले.
प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 10:40 PM
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे सोमवारी कृषी दिनाचा कार्यक्रम मा. सा. कन्नमवार सभागृहात पार पडला. यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे तर मंचावर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अभियंता राहुल कर्डिले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जि. प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गोदावरी केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, उपविभागीय कृषी अधिकारी काळे, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे आदींची उपस्थिती होती.
ठळक मुद्देजिल्हा परिषदचा उपक्रम : कृषी दिन उत्साहात साजरा