कोरोनामध्ये सर्दी, ताप, खोकला काढण्यासह रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी, कफ पातळ होऊन पडण्यासाठी औषधी वनस्पतींच्या पाना-मुळांपासून काढे तयार करण्यात येतात. विविध रोगांवर औषधी वनस्पतीतील गुणधर्मांमुळे रामबाण उपचार आहे, असा समज आहे. औषधी वनस्पतींचे महत्त्व कळल्यामुळे ग्रामीण भागातही जनतेचा कल वाढला आहे. तुळशीच्या पानांचा उपयोग औषधाव्यतिरिक्त तेल हिवताप, कफज्वरावर तुळस गुणकारी आहे. तुळशीची पाने नित्य सेवन करणे फायदेशीर आहे. अडुळशाचा रस मधासह दिला जातो. ओली किंवा सुकी पाने, सालीचा उपयोग केला जातो. गुळवेल प्रामुख्याने जुलाब व हगवणीवर, पोटातील मुरडा, तसेच कृमी यावर गुणकारी आहे. शिवाय रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठीसुद्धा त्याचा वापर केला जातो. कडुनिंबाच्या अंतरसालचापण काढा काढण्यात येत आहे. भुइनिंब, गोंगलाची मुळी, पिंपळाच्या पानाचा काढा असल्या विविध औषधी वनस्पती म्हणून सर्रास वापर केला जात आहे.
कोरोनाची भीती; ग्रामीण भागात औषधी वनस्पती काढा काढण्याकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:28 AM