आॅनलाईन लोकमतवरोरा : काही शेतकरी जमिनीचे परिक्षण न करता विविध प्रकाराची खते आणि किटकनाशकांची फवारणी करतात. यातून जमिनीचा पोत बिघडतो. उत्पन्नात कमालीची घट होते. यावर प्रभावी पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी मातीची तपासणी करणे गरजेचे आहे. कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात अतिशय कमी शुल्कात ही सेवा उपलब्ध केली असून शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यास शेतीची दूरवस्था दूर शक ते.वरोरा तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कापूस, सोयाबीन व भाताची शेती केली जाते. शेतकऱ्यांमध्ये आता जागृती वाढत असली तरी आजही म्हणावे तसे प्रमाण वाढले नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रातील नव्या संकल्पनांचा स्वीकार करण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून माती परिक्षणाविषयी जागृती केली जात आहे. शेतीचे एकूण क्षेत्र लक्षात घेवून सावलीखालील अथवा शेताच्या काठावरची जमीन माती तपासणीसाठी योग्य ठरणार नाही. तसेच शेतात शेवाळ असल्यास त्या भागातली माती तपासणीसाठी घेऊ नये. सतत ओलावा नसेल, अशा जागेवरील माती परिक्षणासाठी योग्य नमूना ठरु शकतो. निष्कर्ष योग्य निघतात.ओलसर जमिनीचे नमुने टाळावेमातीचा नमुना घेण्यासाठी विविध अवजारांचा वापर केला जाऊ शकतो. उदा. फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत. मातीचा नमूना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वीच घ्यावा. पिकास रासायनिक खत दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत सदर जमिनीतून मातीचा नमूना घेऊ नये. निरनिराळ्या प्रकारची जमीन किंवा शेतातील मातीचे नमूने एकत्र मिसळू नयेत. माती नमूना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविताना रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्यांचा वापरू नये. शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाड, विहिर पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमूने घेऊ नयेत.नमूना घेण्याची पद्धतनमूना काढण्यासाठी प्रथम शेतीची पाहणी करावी. जमिनीच्या प्रकारानुसार शेताचे विभाग पाडावेत. त्यानंतर जमिनीचा रंग, खोली, पोत, उंच व सखलपणा, पाणथळ किंवा ओलसर जागा आदी बाबींचा विचार करून प्रत्येक विभागातून स्वतंत्र प्रातिनिधिक नमूना घ्यावा. एका हेक्टरमधून १५ते २० ठिकाणची माती घ्यावी. नमूना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा. निवडलेल्या प्रत्येक ठिकाणाच्या जागेवरील काडीकचरा, दगड इत्यादी बाजूला करावेत. प्रत्येक ठिकाणी इंग्रजी (व्ही) आकाराची हंगामी पिकासाठी २५ सें.मी., तर फळपिकांसाठी ६० सें.मी. खोलीचा खड्डा घेऊन त्यातील माती बाहेर काढून खड्डा मोकळा करावा.पिकांची नोंदणी करावीसर्व बाजूने सारख्या जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासून ती स्वच्छ घमेल्यात गोळा करून गोणपाटावर ठेवावी. प्रत्येक खुणेजवळ खड्डे घेऊन एका शेतातून गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी, तिचे सारखे चार भाग करावेत. समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून, त्याचे चार भाग करावेत. त्यानंतर पुन्हा समोरासमोरचे दोन भाग वगळावेत. अशा तºहेने शेवटी दोन ओंजळी किंवा अर्धा किलोग्रॅम माती शिल्लक उरेपर्यंत हीच क्रिया करावी. मातीच्या नमुन्यासोबत शेतकºयाचे नाव, गाव, जिल्हा, सर्व्हे गट नंबर आणि पुढील हंगामात घ्यावयाचे पीक याबाबत सविस्तर माहिती लिहून जिल्हास्थळ अथवा संबंधित तालुक्यातील माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावी.
माती परीक्षणातून राखा शेतजमिनीची सुपिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:58 PM
काही शेतकरी जमिनीचे परिक्षण न करता विविध प्रकाराची खते आणि किटकनाशकांची फवारणी करतात. यातून जमिनीचा पोत बिघडतो. उत्पन्नात कमालीची घट होते. यावर प्रभावी पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी मातीची तपासणी करणे गरजेचे आहे.
ठळक मुद्देतालुकास्थळी सेवा उपलब्ध : पुढील हंगामात होईल पिकांना लाभ