अशातच कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, केंद्र सरकार खतांच्या व शेतीवरील संसाधनाच्या मूल्य दरात वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी केला.
सध्याचे भाजप प्रणीत केंद्र सरकार हे शेतकरीविरोधी असून खते, बी-बियाणे व शेतीवरील अवजारांच्या मूल्य दरात वाढ करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात आहे. डिझेलच्या वाढत्या किमती, खतांच्या व शेती अवजारांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु शेतकऱ्यालाच आज जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्याला बसत असून एकीकडे केंद्र सरकार दोन हजार रुपये देते तर त्याच शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांची वसुली करून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडते. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होत असलेले नुकसान हे फार भयावह आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने खते, बी-बियाणे व शेतीवरील अवजारे यांच्या किमती तत्काळ कमी कराव्यात, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.
वाढलेले खताचे दर व शेतीवरील अवजारांच्या किमती कमी करण्यात आल्या नाही, तर याविरोधात वंचित बहुजन आघाडी राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला. निवेदन देताना वंचितचे नेते राजू झोडे, संपत कोरडे, सचिन पावडे, नवीन डेविड, भूषण पेटकर, जाकीर खान, प्रदीप झांबरे, चेतन वासनिक तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
260521\img-20210526-wa0002.jpg
===Caption===
सरकारने वाढविलेल्या खताच्या किंमती कमी कराव्या