खरीप हंगामाला सुरूवात होताच, कृषी विभागाने शासनाकडून खताचे आवंटन मंजूर करून शेतकऱ्यांसाठी खत उपलब्ध करून दिले आहे. मंगळवारी चंद्रपूरच्या रेल्वे मालधक्क्यावर खताची रॅक लागली. आलेले खत उतरवून ट्रकांद्वारे तालुका मुख्यालयी पाठविण्यात आले. जिल्ह्याला दरवर्षी एक लाख मेट्रिक टन खताची गरज असते. यावर्षीही खताची कोणतीच अडचण भासणार नाही, असे कृषी विभागाने म्हटले आहे.
रँक पार्इंटवर खत उतरले
By admin | Published: June 18, 2016 12:32 AM