नागभीड: लोकमत सखी मंच नागभीडतर्फे स्थानिक टिचर्स सोसायटीमध्ये मंगळवारी सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सखींनी सादर केलेल्या एकापेक्षा एक अशा नृत्याविष्काराने महोत्सवात रंग भरले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विनता शेंडे होत्या, तर उद्घाटक म्हणून विजय एकवनकर होते. प्रमुख अतिथी म्हणून गणेश तर्वेकर, वंदना शिवणकर, दुर्गा नगराळे, ज्योती चिलबुले उपस्थित होत्या. स्पर्धेचे परीक्षण नृत्य शिक्षिका मेघा फटींग, रितेश गोडे, सदा बनकर, यांनी केले. चंदा शिंदे, उज्ज्वला भुरे यांनी स्वागत गीत सादर केले. सखी सदस्यता नोंदणीमध्ये ज्यांनी सहकार्य केले, अशा सखींचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये छाया बंडेवार, रेखा देशमुख मीना पंत, कुंदा देशमुख, पूनम बोरकर, सरोज खापर्डे, कांचन वारजुरकर, मंदा मेश्राम, दुर्गा नगराळे, मनीषा बागडे यांचा समावेश होता. तालुका संयोजिका रजनी घुटके यांनी प्रास्ताविक केले. महोत्सवामध्ये एकल नृत्य, युगल नृत्य, समूह नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यात सखींनी मोठ्या संख्येने भाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरी खुणे हिने गणेश वंदना सादर केली. एकल नृत्यामध्ये १५ सखींनी भाग घेतला. त्यामध्ये प्रथम नलिनी बांगरे, द्वितीय राणी मुंगणकर, तृतीय अनु शिवहरे तर युगल नृत्यामध्ये प्रथम अंजली भाजे, जान्हवी गुरव, द्वितीय वंदना चिमूरकर, मंजुषा बंडेवार, तृतीय क्रमांक सरोज खापर्डे, निशा ढोले यांनी पटकाविला. समूह नृत्य स्पर्धेत आठ चमूंनी भाग घेतला. त्यामध्ये प्रथम अनुपमा आखरे ग्रुप, द्वितीय पूनम बोरकर ग्रुप, तर तृतीय क्रमांक कुंदा देशमुख ग्रुपने पटकाविला. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शीला बेहरे, मनीषा माटे, अनुराधा रामटेके, तेजस्विनी मेश्राम, सपना खोब्रागडे, भावना बावनकर, सपना सेलोकर, प्रज्ञा वंजारी, सारिका सहारे, मनीषा बागडे, उर्मिला अमृतकर, मंदा वाघ, शरयू दडमल, कल्पना लांजेवार आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
सखींच्या नृत्याविष्काराने महोत्सवात रंगत
By admin | Published: April 04, 2015 12:35 AM