रायुकाँचे निदर्शने : नवाज शरीफ यांचा पुतळा जाळलाचंद्रपूर : कश्मीरमधील उरी येथे सैन्यांच्या बेस कॅम्पवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सैन्यांना चंद्रपुरात मानवंदना देऊन जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे या घटनेचा निषेध म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत भारत सरकारने जशासतसे उत्तर देण्याची मागणी केली.या आंदोलनात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून मुर्दाबादची पट्टी बांधण्यात आली. सोबतच त्यांचा फोटो व पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले. आंदोलनात सहभागी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भारत माता की जय, भारतीय जवान अमर रहे, अशा घोषणा देत असताना पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.सदर आंदोलन रायुकाँ जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले. यात राविकाँ शहरध्यक्ष सुजित उपरे, दुर्गापूर सरपंच अमोल ठाकरे, संजय ठाकूर, महेंद्र मेश्राम, किसन अरदळे, सुनील काळे, राहुल भगत, अनुराग चटप, अविनाश जेणेकर, जयदेव नन्नावरे, किशोर सिडाम, उमेश तुरकर, पवन बंडीवार, गुणू बंडीवार, प्रफुल्ल कुचनकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)राजुऱ्यातही रोष काश्मीर घटनेच्या निषेधार्थ राजुरा शहरातील विविध संघटनांनी व मार्निंग गृप बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने पंचायत समिती चौकात आदंराजली वाहण्यात आली. त्यानंतर आक्रोश व्यक्त करीत पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले.
पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत तीव्र रोष
By admin | Published: September 22, 2016 12:46 AM