लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आदिवासी आमदार राजू तोडसाम यांचा सार्वजनिक अवमान करणाºया कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन अभाआविपतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.यवतमाळ जिल्ह्यातील आर्वी विधानसभा क्षेत्राचे आदिवासी आ. राजू तोडसाम यांचेविरुद्ध शासकीय कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी पैशाची मागणी केली म्हणून आॅडिओ क्लीप व्हायरल करून आ. तोडसाम यांची सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा मलीन केल्यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच शासकीय कंत्राटदार असताना देखील शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय आ.तोडसाम यांची नाहक बदनामी केली. त्यामुळे त्यांचा कंत्राटी परवाना रद्द करण्यासह अॅट्रासिटीचा गुन्हा नोंद करुन कडक कार्यवाही करण्याची मागणी अभाआविपचे विदर्भ सचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक यांचे नेतृत्वातील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे करण्यात आली आहे.तसेच सदर घटनाप्रकरण पूर्व नियोजित षडयंत्राचा प्रकार असल्याने कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांच्या अभाआविपतर्फे तिव्र निषेध करण्यात आला. अशाच कंत्राटदारांना मिळत असलेल्या राजकीय अभयामुळे यवतमाळ जिल्ह्यात आदिवासींमधील अत्याचारपीडिीत कुमारी मातांची निर्मिती झाल्याची शंका आदिवासी सेवक तिराणिक यांनी व्यक्त केली आहे. यावेळी बाबूराव जुमनाके, श्रीरंग मडावी, हिरामण शेडमाके, रवी मसराम, निळकंठराव नैताम, आनंदराव कुमरे, विशाल नैताम, रोशन मडावी, अमर चांदेकर, जयंत नैताम उपस्थित होते.
आमदारांचा अवमान करणाºयावर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:45 PM
आदिवासी आमदार राजू तोडसाम यांचा सार्वजनिक अवमान करणाºया कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन अभाआविपतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद