शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:01 AM

चंद्रपूर शहरातील अनेक वर्षे तांत्रिक आणि जमीन अधिग्रहणाच्या कामाने रखडलेला बाबुपेठ रेल्वे उड्डाणपूल साकारण्याचा मार्ग राज्य शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाने मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी विशेष बाब म्हणून सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारकांना एकरकमी नुकसान भरपाई देण्याबाबत अनुकूल निर्णय दिला आहे.

ठळक मुद्देबाबूपेठमधील अतिक्रमणधारकांना मिळणार भरपाई : पालकमंत्र्यांकडून आश्वासनाची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अनेक वर्षे तांत्रिक आणि जमीन अधिग्रहणाच्या कामाने रखडलेला बाबुपेठ रेल्वे उड्डाणपूल साकारण्याचा मार्ग राज्य शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाने मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी विशेष बाब म्हणून सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारकांना एकरकमी नुकसान भरपाई देण्याबाबत अनुकूल निर्णय दिला आहे.या उड्डाण पुलाचा आरखडा, निधी आणि तांत्रिक मंजुरी होऊनही अपेक्षित जागेवरील अतिक्रमण केलेल्या रहिवाशांना न्याय देण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली होती. त्यानुसार या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी एक उच्चस्तरीय सचिव गट निर्माण करण्यात आला होता. या समितीने सकारात्मक अहवाल दिला असून बाबुपेठ उड्डाण पुलाच्या प्रस्तावित जागेवरील अतिक्रमणधारकांना आता एकरकमी नुकसान भरपाई मिळणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अतिक्रमणधारकांच्या नुकसान भरपाईसाठी सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, यासाठी मंत्रिमंडळात हा विषय लावून धरला होता. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे २५ कोटी रुपयांचा निधी वळता करण्यात आला होता. यासोबतच केंद्र शासनाच्या स्तरावर रेल्वे विभागाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रेल्वे विभागाच्या पहिल्या अर्थ संकल्पात बाबुपेठ उडाणपुलाला मंजुरी मिळवून देण्याकरिता कसोशीने प्रयत्न केले होते. बाबुपेठच्या नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आ. नाना श्यामकुळे यांनी मनपा ते मुख्यमंत्री असा संपर्क ठेऊन उड्डाण पुलाचे काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न चालविले होते. उड्डाण पुलाच्या जागेवरील ६८ मालमत्ताधारकांना सन २०१५ च्या दरसुचीनुसार तीन कोटी १५ लाख ०५ हजार ६३५ रु. मोबदल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे तर रेल्वेच्या जागेवरील ७३ मालमत्ताधारकांसाठी ९५ लाख ४९ हजार ७७२ रु. चा प्रस्ताव आहे. एकूण चार कोटी १० लाख ५५ हजार ४०७ रुपयांच्या निधीची यासाठी आवश्यकता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने बाबुपेठ उड्डाणपुलाच्या निर्मितीतील सर्व अडथळे दूर झाले असून सुमारे ६२ कोटी रुपयांचा निधी खर्चून या पुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वे